भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे रविवारी मुख्यमंत्री मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन  

सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचे लोकार्पण तसेच विविध प्रकल्पांचा ऑनलाईन शुभारंभ होणार
 
ठाणे  : महानगरपालिका क्षेत्रातील मूलभूत सोयीसुविधांचा विकास या योजने अंतर्गत, आमदार प्रताप सरनाईक यांच्या प्रयत्नांने ठाणे महापालिका क्षेत्रातील वर्तकनगर येथे रेप्टोक्रॉस आरक्षित भूखंड येथे होत असलेल्या भारतरत्न स्व. लता दीनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल) रविवार, १९ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते भूमिपूजन होणार आहे. या कार्यक्रमास मंगेशकर परिवार उपस्थित राहणार आहे.
 
भूमिपूजन सोहळा वर्तकनगर येथील विद्यालयाच्या बांधकाम स्थळी होणार आहे. त्याचबरोबर, पोखरण रोड नं. ०१ येथील सिंघानिया शाळेसमोरील पादचारी पुलाचे लोकार्पण केले जाणार आहे. त्यानंतर, मुख्य सोहळा डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे सकाळी ११.०० वाजता संपन्न होईल. शहरातील जुन्या विहिरींची शास्त्रोक्त पद्धतीने सफाई आणि पुनर्बांधणी या कामाचा, तसेच, अमृत २.० योजने अंतर्गत वर्तकनगर-लोकमान्य नगर, घोडबंदर परिसरातील पाणी पुरवठा वितरण व्यवस्थेचे मजबुतीकरण आणि विस्तारीकरण प्रकल्प यांचा शुभारंभ, डिजिटल बोर्ड उभारणी, तलावांमधील संगीतमय कारंजी उभारणी व सुशोभीकरण, रस्त्यांवर शोभिवंत रेलिंग लावणे या कामांचा ऑनलाईन पद्धतीने शुभारंभ मुख्य सोहळ्यात करण्यात येणार आहे.
 
            या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील, राज्य उत्पादन शुल्क मंत्री तसेच ठाण्याचे पालक मंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री मा. ना. रवींद्र चव्हाण उपस्थित राहणार आहेत.
 
याप्रसंगी, ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर, ज्येष्ठ गायिका आणि संगीतकार मीना खडीकर, ज्येष्ठ गायक आदिनाथ मंगेशकर, संगीतकार मयुरेश पै यांची विशेष उपस्थिती असेल. तसेच, खासदार राजन विचारे, खासदार  श्रीकांत शिंदे, खासदार कुमार केतकर, आमदार मा. डॉ. जितेंद्र आव्हाड, आमदार  प्रताप सरनाईक, आमदार  संजय केळकर, आमदार  प्रमोद पाटील, आमदार मा. ॲड.  निरंजन डावखरे यांची या सोहळ्यास सन्माननीय उपस्थिती असणार आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आदर्श सेवाभावी सामाजिक संस्था'ची आदिवासी भगिनींना भाऊबीज भेट