दिवाळी सुट्टी निमित्त बालनाट्य शिबीर

१७ ते २७ नोव्हेंबर दरम्यान भावे नाट्यगृह येथे शिबिराचे आयोजन

नवी मुंबई : दिवाळी सुट्टी निमित्त ज्येष्ठ रंगकर्मी श्रीहरी पवळे यांनी संत शिरोमणी कला मंच नवी मुंबई, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद नवी मुंबई आणि नवी मुंबई बालरंग भूमी यांच्या संयुक्त विद्यमाने १७ ते २७ नोव्हेंबर २०२३ या कालावधीमध्ये बालनाट्य शिबिराचे आयोजन केले आहे.

सदर बालनाट्य शिबीर वाशीमधील विष्णुदास भावे नाट्यगृह तालीम हॉल येथे दररोज सायंकाळी ५ ते ७ या वेळेत होणार आहे. नवकलाकारांच्या सुप्त कलागुणांना योग्य संधी मिळावी आणि त्यातून चांगले कलाकार घडावेत चांगले नाट्य रसिक घडावेत, या उद्देशाने गेली २७ वर्ष श्रीहरी पवळे बालनाट्य शिबिराचे आयोजन करीत आहेत. जे विद्यार्थी मागील शिबिरात सतत सहभागी झाले होते त्यांना सदर शिबीर विनामूल्य असणार आहे. ज्या पालकांना आपल्या पाल्याला या शिबिरामध्ये सहभागी करुन घ्यायचे असेल त्यांनी श्रीहरी पवळे (९३२२५०४३१४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सार्वजनिक रस्त्यावर खाजगी कंपनीची दादागिरी?