बहुप्रतिक्षित ‘नवी मुंबई मेट्रो'ला ग्रीन सिग्नल

मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार १७ नोव्हेंबर पासून ‘मेट्रो' नवी मुंबईकरांच्या सेवेत

नवी मुंबई : नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार ‘सिडको'तर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र.१ वर १७ नोव्हेंबर २०२३ पासून औपचारिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री शिंदे यांच्या या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.

‘सिडको'तर्फे नवी मुंबईमधील सार्वजनिक परिवहन व्यवस्था अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीकोनातून नवी मुंबई मेट्रो प्रकल्प साकारण्यात येत आहे. या प्रकल्पांतर्गत एकूण ४ उन्नत मार्ग विकसित करण्यात येत असून प्रथम बेलापूर ते पेंधर या ११.१० कि.मी. लांबीच्या मार्ग क्र.१ चे काम हाती घ्ोण्यात आले होते. सदर मार्गावर एकूण ११ स्थानकांसह तळोजा पंचनंद येथे आगार (डेपो) आहे.  मार्ग क्र.१ ची अंमलबजावणी करण्याकरिता अभियांत्रिकी सहाय्य म्हणून ‘सिडकोे'तर्फे ‘महा मेट्रो'ची नियुक्ती करण्यात आली होती. मार्ग क्र.१ वर धावणाऱ्या ‘मेट्रो'च्या ऑसिलेशन, विद्युत सुरक्षा, ईमर्जन्सी ब्रेक आदि चाचण्या यशस्वीरित्या पार पाडण्यात येऊन त्याबाबतचे प्रमाणपत्रही संबंधित यंत्रणांकडून प्राप्त झाले. तद्‌नंतर ‘मेट्रो'च्या वाणिज्यिक परिचालनाकरिता (म्दस्सीम्ग्ीत् दजीीूग्दह) सर्वात महत्त्वाचा टप्पा असलेली सीएमआरएस (मेट्रो रेल सुरक्षा आयुक्त) यांच्यातर्फे करण्यात आलेली चाचणीदेखील यशस्वीरीत्या पार पडून मार्ग क्र.१ वर प्रवासी वाहतूक सुरु करण्याकरिता सीएमआरएस यांचे प्रमाणपत्रही प्राप्त झाले असून १७ नोव्हेंबर २०२३ पासून सदर मार्गावर मेट्रो सेवा सुरू होणार आहे.

अत्याधुनिक रचनेचे वातानुकूलित डबे, मेट्रो स्थानकांच्या दोन्ही (उत्तर-दक्षिण) बाजुने आगमन (एन्ट्री) आणि निर्गमनाची (एक्झिट) व्यवस्था आहे. मेट्रो स्थानकांवर पाकर्िंगसाठी जागा, दिव्यांग प्रवाशांकरिता रॅम्प, पदपथ (फुटपाथ), ऑटो रिक्षांकरिता जागा, अखंड वीज पुरवठ्यासाठी युपीएस सह डिझेल जनरेटरची (डीजी) व्यवस्था, कॉनकोर्स आणि फलाटांवर प्रवासी घोषणा प्रणाली, सीसीटीव्ही, दिव्यांग व्यक्तींसाठी कॉनकोर्स स्तरावर विशेष स्वच्छतागृहांची व्यवस्था, कॉनकोर्स परिसरात व्यावसायिक वापराच्या दृष्टीने दुकानांकरिता जागा, अशी नवी मुंबई मेट्रो प्रकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.

नवी मुंबई मेट्रो सेवा १७ नोव्हेंबर रोजी पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान दुपारी ३ वाजता सुरु होऊन शेवटची फेरी रात्री १० वाजता असणार आहे. तर १८ नोव्हेंबर २०२३ पासून पेंधर ते बेलापूर टर्मिनल आणि बेलापूर टर्मिनल ते पेंधर दरम्यान सकाळी ६ वाजता पहिली मेट्रो धावणार असून दोन्ही बाजुंकडून ‘मेट्रो'ची शेवटची फेरी रात्री १० वाजता होणार आहे. सदर मार्ग क्र.१ वर दर १५ मिनिटांच्या अंतराने मेट्रो धावणार आहे.

‘नवी मुंबई मेट्रो'च्या तिकीटाचे दर अंतरानुसार निश्चित करण्यात आले आहेत. त्यानुसार ० ते २ कि.मी.च्या टप्प्याकरिता १० रुपये, २ ते ४ कि.मी.करिता १५ रुपये, ४ ते ६ कि.मी.साठी २० रुपये, ६ ते ८ कि.मी.करिता २५ रुपये, ८ ते १० कि.मी.करिता ३० रुपये आणि १० कि.मी.पुढील अंतराकरिता ४० रुपये.
सर्व नवी मुंबईकरांनी आपल्या दैनंदिन वापरासाठी नवी मुंबई मेट्रोच्या या वातानुकूलित, आरामदायी व निसर्गरम्य प्रवासाचा अनुभव घ्ोऊन परवडणाऱ्या दरात सुखकर प्रवास करावा असे सिडकोतर्फे आवाहन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपले अनुभव सिडकोच्या अधिकृत समाजमाध्यमांवरदेखील शेअर करावेत. सिडकोची अधिकृत समाजमाध्यमे खालीलप्रमाणे  फेसबुकः ॅण्घ्ण्ध्ञ्थ्ू्‌, X-ॅण्घ्ण्ध्ञ्थ्ू्‌ इन्स्टाग्रामः ॅम्ग्‌म्दञ्त्ू्‌.

बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो १७ नोव्हेंबर पासून नवी मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. याबद्दल नवी मुंबईकरांचे हार्दिक अभिनंदन. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी औपचारिक उद्‌घाटनाची वाट न बघता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश ‘सिडको'ला दिले होते. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवेला प्रारंभ होत आहे, याबद्दल ‘सिडको'चे अभिनंदन आणि नवी मुंबईकरांना शुभेच्छा. ‘मेट्रो'द्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये ‘सिडको'च्या माध्यमातून ‘मेट्रो'च्या अंमलबजाणीचे काम प्रभावीपणे सुरु आहे. - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

१७ नोव्हेंबर पासून नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील मार्ग क्र.१ वरील बेलापूर ते पेंधर दरम्यान मेट्रो सेवा सुरु होत असून नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न साकार होत आहे. ‘मेट्रो'च्या रुपाने नवी मुंबईकरांना जलद, पर्यावरणपूरक आणि आरामदायी परिवहनाचा एक सक्षम पर्याय उपलब्ध होणार आहे. सीबीडी-बेलापूर सह वेगाने विकसित होत असलेल्या खारघर, तळोजा नोडस्‌ना ‘मेट्रो'द्वारे उत्तम कनेक्टिव्हिटी लाभणार आहे. नवी मुंबईच्या आंतरराष्ट्रीय शहर या लौकिकाला साजेशी उत्तम आणि सक्षम परिवहन व्यवस्था ‘मेट्रो'द्वारे निर्माण होणार आहे.”  - अनिल डिग्गीकर, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक, सिडको.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

इंडियन ऑईल विरोधात धुतूम ग्रामस्थ आक्रमक