दिवाळीच्या फटाक्यांमुळे ऐरोलीतील डायग्नोस्टिक सेंटरला आग

ऐरोली मधील सेक्टर १५ येथील डायग्नोस्टिक सेंटरला आग

नवी मुंबई -:दीपावलीच्या निमित्ताने सर्वत्र  फटाके फोडले जात होते. मात्र सदर फटाक्यांमुळे  ऐरोली मधील सेक्टर १५ येथील डायग्नोस्टिक सेंटरला आग लागल्याची घटना घडली आहे.मात्र सदर आगीत कुठलीही जिवित हानी किंवा कोणी जखमी झाले नाही.

येथील  सेक्टर १५  साईबाबा प्लाझा मार्केट मध्ये पहिल्या मजल्यावर  रक्त तपासणी  व विविध चाचण्या करणारे संपूर्ण डायग्नोस्टिक सेंटर  आहे आणि या सेंटरला पावसाळ्यात गळती लागते म्हणून बांबू बांधून त्यावर प्लास्टिकचे आच्छादन दीले होते. मात्र रवीवारी दिवाळी निमित्त सर्वत्र फटाक्यांची आतीषबाजी सुरु होती .आणि ही आतीषबाजी सुरु असतानाच रात्री उशिरा रात्री दीड दोनच्या सुमारास एक फटाका  या प्लास्टिकच्या आच्छादनावर पडताच प्लास्टिकने पेट घेतला आणि भीषण आग लागली.आगीची घटना समजताच ऐरोली अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविले. सदर आग ही रात्री उशिरा लागल्याने हे सेंटर मनुष्य विरहित होतें. त्यामुळे या आगीत कुठलीही जिवित हानी किंवा कोणी जखमी झाले नाही .अशी माहिती ऐरोली अग्निशमन दलाचे अधिकारी एकनाथ पवार यांनी दिली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

शांतीवन नेरे, स्वप्नालय बालगृह आणि डोंगरीचा पाडा, वाझे येथे संवेदनातर्फे दिवाळी साजरी