ज्येष्ठ नागरिक संघ नेरुळ तर्फे वृद्धाश्रमात दिवाळी फराळाचे वाटप

वात्सल्य ट्रस्टमधील वृध्दांना, अनाथाश्रमातील महिलांना दिला दिवाळी फराळ

नवी मुंबई : धन्वंतरी जयंतीचे औचित्य साधून १० नोव्हेंबर रोजी नेरुळ येथील ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने नवी मुंबईतील सानपाडा येथील वात्सल्य ट्रस्ट मधील वृद्धाश्रम आणि अनाथ आश्रम मधील महिला आणि मुलींना दिवाळी फराळाचे वाटप करुन त्यांचीही दिवाळी आनंदी करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  

या उपक्रमात नेरुळ ज्येष्ठ नागरिक संघाच्या सर्वश्री अरविंद वाळवेकर, प्रभाकर गुमास्ते, दीपक दिघे, रणजित दिक्षित, विकास साठे, अजय माढेकर, दत्ताराम आंब्रे, रमेश गायकवाड, सुनिल आचरेकर, श्रीमती सुचित्रा कुंचमवार, श्रीमती रजनी कलोसे, श्रीमती निर्मला शिंदे, श्रीमती कल्पना मोहिते आधी सभासदांनी सक्रिय सहयोग देऊन कार्यक्रम यशस्वी केला.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळीच्या फटाक्यांमुळे ऐरोलीतील डायग्नोस्टिक सेंटरला आग