गायिका आर्या आंबेकरच्या सुश्राव्य सुरेल मैफिलीने सजली दिवाळी पहाट

प्रभू श्रीरामांची आणि अयोध्या मंदिराची प्रतिकृती आरास विशेष आकर्षण

पनवेल : प्रभू श्रीरामांची आणि अयोध्या मंदिराची प्रतिकृती आरास, दीपावलीचा उत्साह, थंडीचा गारवा आणि त्यामध्ये सुप्रसिध्द गायिका आर्या आंबेकर यांच्या सुश्राव्य सुरेल गाण्यांच्या मैफिलीने पनवेल मध्ये दिवाळीची पहाट सजली. निमित्त होते... पनवेल महापालिका आयोजित तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर, माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रायोजित ‘दिवाळी पहाट'चे. ११ नोव्हेंबर रोजी पहाटे पनवेल शहरातील वडाळे तलाव येथे संपन्न झालेल्या या ‘दिवाळी पहाट'ने दीपावली सणाचा आनंद सात्विक आणि द्विगुणित केला.

यंदा दिवाळी पहाटचे ७ वे वर्ष होते. यानिमित्त झालेल्या सदर ‘दिवाळी पहाट'ने वातावरण प्रफुल्लित केले. यावेळी वडाळे तलाव परिसर हजारो श्रोत्यांच्या उत्स्फुर्त प्रतिसादाने गजबजला होता. या तलावाच्या सौंदर्याने आणि निर्सगाच्या सानिध्यात झालेल्या मैफीलने पहाट ते कोवळ्या उन्हाच्या साक्षीने तेजोमय संगीत बहरत होते. यामध्ये झी मराठी लिटिल चॅम्प फेम आर्या आंबेकर आणि सहकाऱ्यांनी सुश्राव्य गाण्यांची सुरेल मैफिल सादर केली. आर्या आंबेकर आणि सहगायक सौरभ यांनी विविध गाणी सादर करुन वातावरण संगीतमय केले. एकाहून एक गीते सादर करीत त्यांनी रसिकांची वाहवा मिळवली तर या सोहळ्याचे निवेदनही तेवढ्याच खुमासदार पध्दतीने अभिजित कुलकर्णी यांनी केले. यावेळी वाद्यवृंदावरची साथही तेवढीच ताकदीची होती. अमेय ठाकूर, प्रथम कुलकर्णी, अनिल, झंकार कानडे, सागर, सिध्दार्थ कदम यांनी वाद्यवृंदावर साथ दिली.  याद्वारे हजारो रसिकांनी या संगीत फराळाचा लाभ घेतला.  

 याप्रसंगी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, त्यांच्या सुविद्य पत्नी शकुंतला ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर, सुप्रसिध्द नेत्रतज्ञ डॉ. सुहास हळदीपूरकर, महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर, ‘भाजपा'चे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, महापालिका सहआयुक्त गणेश शेट्ये, माजी महापौर डॉ. कविता चौतमोल, वर्षा ठाकूर, अर्चना ठाकूर, रायगड भूषण पंडीत उमेश चौधरी, जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, चारुशीला घरत, पनवेल शहर अध्यक्ष अनिल भगत, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, मदन कोळी, ‘महिला मोर्चा'च्या शहर अध्यक्षा राजेश्री वावेकर, मनोहर म्हात्रे, अजय बहिरा, दर्शना भोईर, रुचिता लोंढे, वृषाली वाघमारे, मंदा भगत, राजेंद्र पाटील, ‘सांस्वृÀतिक सेल'चे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, ज्येष्ठ कार्यकर्ते अजय कांडपिळे, रवींद्र जोशी, ‘युवा मोर्चा'चे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, सुमित झुंझारराव, अमोघ ठाकूर, आदेश ठाकूर, चिन्मय समेळ, रोहित जगताप, अमोल खेर, अभिषेक भोपी, गणेश जगताप, वैभव बुवा, अक्षय सिंग, आदित्य उपाध्याय यांच्यासह सामाजिक, शैक्षणिक, कला, संगीत, वैद्यकीय, विधी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबईकर ज्येष्ठ नागरिकांना दिवाळी भेट