नाट्य दरवळ, मोहिनी गौरव पुरस्कार २०२३ चे वितरण

नवी मुंबईतील रंगकर्मींचा ‘मोहिनी गौरव पुरस्कार' देऊन सन्मान

नवी मुंबई : मोहिनी आर्ट अकॅडमी, नवी मुंबई यांच्या माध्यमातून यंदाही ‘नाट्य दरवळ,' ‘मोहिनी गौरव पुरस्कार  २०२३' चे आयोजन ५ नोव्हेंबर मराठी रंगभूमी दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते. नवी मुंबईत वास्तव्यास असलेले आणि नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रंगकर्मींना ‘मोहिनी गौरव पुरस्कार' देऊन सन्मान करण्यात आला. या पुरस्कारांमध्ये श्रीमती वासंती भगत, श्रीहरी पवळे, अमोल देशमुख, विजय पवार, प्रशांत निगडे, विरिशा नाईक यांनी नाट्य क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आल्याची माहिती ‘मोहिनी आर्ट अकॅडमी'चे संचालक रविंद्र वाडकर यांनी दिली. वाडकर यांच्या संकल्पनेतून या सोहळ्याचे आयोजन २००१ पासून नियमितपणे केलें जात आहे.

मराठी रंगभूमी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमास न.मुं.म.पा.चे  माजी विरोधी पक्षनेते दशरथ भगत, साहित्यिक व तमाशा आणि लोककला अभ्यासक डॉ.मिलिंद कसबे, शिवदास घोडके, सुप्रसिद्ध उद्योजक मारुती अंबावले, वैजयंता भगत, मराठी साहित्य मंदिराचे अध्यक्ष सुभाष कुलकर्णी, ई. ए. पाटील, चित्रपट निर्माती लीलावती अंबावले आदी मान्यवर उपस्थित होते. मराठी रंगभूमी दिनानिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या या सोहळ्यात ‘नाट्य दरवळ' अंतर्गत, रवी वाडकर लिखित ‘अर्धरात कलली...'आणि ‘नजर' या दोन एकांकिकांचे यशस्वी सादरीकरण करण्यात आले. नजर एकांकिकेमध्ये रवी वाडकर आणि ऋतुजा भगत तर, अर्धरात कलली या एकांकिकेत निखील आवटे, बालाजी माने, गौरव गिरी, दिव्या चौधरीपगार, स्वप्नाली मोरे यांनी आपल्या अभिनयाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रेश्मा मस्के, साक्षी म्हात्रे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण लोकलला आजही रेड सिग्नल