‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान'

पनवेल महापालिका तर्फे ‘जल दिवाळी'चे आयोजन

पनवेल : केंद्र शासनाच्या ‘गृहनिर्माण-शहरी व्यवहार मंत्रालय'च्या वतीने अमृत २.० अभियान अंतर्गत ७ ते ९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जल दिवाळी साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार पनवेल महापालिकेच्या वतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ‘राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान'च्या सहकार्याने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान' या उपक्रमांतर्गत ‘जल दिवाळी'चे ८ नोव्हेंबर रोजी आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहामध्ये आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगीी उपायुक्त सचिन पवार, शहर अभियंता संजय जगताप, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपअभियंता विलास चव्हाण, निवृत्त कार्यकारी अभियंता विद्याधर खाडीलकर, डेएनयुएलएम विभाग प्रमुख हरेश जाधव, विनया म्हात्रे, नवनाथ थोरात, स्वयंसहाय्यता बचत गटामधील सुमारे ४० महिला उपस्थित होत्या.

महिला कुटुंबाचा कणा असते. त्यामुळे महिलांना पाण्याचे महत्व सांगणे महत्वाचे आवश्यक आहे. त्यामुळे आपोआप कुटुंबालाही त्याचे महत्व कळेल. केंद्र शासन अमृत २.० योजना अंतर्गत पाणी आणि मलनिस्सारण योजना अंतर्गत पनवेल महापालिका टप्प्याटप्प्याने काम करत असल्याचे उपायुवत सचिन पवार यांनी सांगितले.

शहर अभियंता संजय जगताप यांनी पनवेल महापालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या विविध स्त्रोतांची माहिती सांगून दिवसेंदिवस पाण्याचे महत्व वाढते असल्याचे सांगितले. बाहेरील विकतच्या पाण्याच्या तुलनेत महापालिका कमी दरात पाणी प्रत्येक घरापर्यंत पोहोचवते असल्याचे जगताप यांनी सांगितले. त्यामुळे ज्या प्रमाणे आपण विकतचे पाणी काळजीपूर्वंक वापरतो तसेच महापालिका देत असलेल्या पाण्याचाही काळजीपूर्वंक वापर सर्वांनी करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात स्वयंसहाय्यता बचत गटामधील सुमारे ४० महिलांना पनवेल शहरांमधील जलशुध्दीकरण केंद्रास भेट देण्यासाठी घेऊन जाण्यात आले. याठिकाणी पाणी पुरवठा उपअभियंता विलास चव्हाण यांनी महिलांना जलशध्दीकरण केंद्रातील पाण्यावरील विविध प्रक्रियांची माहिती दिली. याचबरोबर नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करुन घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दलही प्रात्यक्षिकासहीत माहिती दिली. पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्येजनजागृती व्हावी तसेच पाण्याचे महत्व ओळखून त्याचा काटकसरीने वापर करावा, असा या भेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीदरम्यान महिलांनीही त्यांच्या मनातील विविध प्रश्नांची उकल करत पाण्याच्या स्त्रोतांपासून ते  घरापर्यंत येणाऱ्या शुध्द पाण्याची प्रक्रिया समजून घेतली.

यानंतर पुन्हा सर्व महिलांना नाट्यगृहामध्ये पाणी शुध्द करण्यासाठीच्या प्रक्रियेचे पॉवरपांईंट सादरीकरणातून सर्व प्रक्रिया समजावून सांगण्यात आली. तसेच महिलांना खास किटचे वाटप करण्यात आले. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक उपायुक्त डॉ. वैभव विधाते यांनी केली. तर सूत्रसंचालन विनया म्हात्रे यांनी केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हवा गुणवत्ता मानकाचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई