सिडको कर्मचाऱ्यांना ५० हजार रुपये बोनस

 

द्वारसभा मध्ये ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'ने मानले व्यवस्थापनाचे आभार

नवी मुंबई : दिवाळी सणानिमित्त सिडको महामंडळामध्ये कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना सिडको व्यवस्थापनाने ५० हजार रुपये सानुग्रह अनुदान मंजूर केले आहे. याबाबतची माहिती ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'च्या वतीने द्वारसभा मध्ये देण्यात आली. यावेळी दिवाळी सणासाठी महाराष्ट्रामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांना मिळणारे सदरचा सर्वात जास्त सानुग्रह अनुदान जाहिर केल्याबद्दल ‘सिडको एम्प्लॉईज युनियन'चे अध्यक्ष विनोद पाटील आणि सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी व्यवस्थापनाचे आभार मानले. दरम्यान, यापुढे सिडको महामंडळामध्ये डेप्युटेशन वरील अधिकाऱ्यांना यापुढे तीव्र विरोध करण्याचे धोरण युनियन अवलंबणार असल्याचे अयक्ष विनोद पाटील यांनी घोषित केले.

अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार थकबाकी, कोव्हीड कालावधीतील प्रलंबित कॅन्टीन कूपन भत्ता, कॅशलेस मेडिकल पॉलिसीमध्ये झालेली वाढ, या मंजूर झालेल्या मागण्यांसदर्भात सरचिटणीस जे. टी. पाटील यांनी व्यवस्थापनाचे विशेषतः ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांचे आभार मानले. तसेच त्यांनी व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर आणि युनियन यांच्यामध्ये झालेल्या बैठकीतील निर्णयाची माहिती दिली. यामध्ये सिडको स्पोर्टस्‌ क्लब, सोसायटी भूखंड, १४३ वर्कचार्ज
बेसिस वरील कर्मचाऱ्यांना सिडको आस्थापनेवर कायम करणे, अग्निशमन कर्मचाऱ्यांस आठ तास ड्युटी आणि अतिरिक्त भत्ते, सोसायटी भूखंड, बाह्यरुग्ण वैद्यकीय भत्त्यात (ध्झ्) वाढ, भरती, टाईमबॉन्ड प्रमोशन, शैक्षणिक भत्त्यात वाढ, आदि महत्वाच्या विषयावर व्यवस्थापनाने सकारात्मक निर्णय घेतले जाऊन त्यावर लवकरच अंमलबजावणी होणार असल्याचे पाटील म्हणाले. लवकरच याविषयावर कार्यवाही अपेक्षित आहे. असे  जे. टी. पाटील यांना सांगितले.

सदर द्वारसभावेळी ४०० ते ५०० कर्मचारी उपस्थित होते. यावेळी सिडको कर्मचाऱ्यांनी आनंदोत्सव साजरा करतानाच सिडको व्यवस्थापनाचेही आभार मानले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी दिली विद्यार्थ्यांना  प्रदुषणमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ