महापालिकेच्या वतीने हवामान कृती दिना निमित्ताने वैद्यकिय आरोग्य विभागाच्या वतीने जनजागृती कार्यक्रम

पनवेल महानगरपालिकेच्या वतीने हवामान कृती दिनाच्या पार्श्वभूमीवरती विविध कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल: पनवेल महानगरपालिकेच्या वतीने नुकताच झालेल्या हवामान कृती दिनाच्या पार्श्वभूमीवरती  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये आयुक्त श्री.गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकिय आरोग्य् विभागाच्यावतीने नियमित लसीकरण सत्रादरम्यान 12 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच बाह्य लसीकरण सत्रांदरम्यान हवामान बदल आणि त्याचे आपल्या आरोग्यावर होणारे परिणाम याची माहिती देण्यात आली. तसेच हवामान बदलाचा प्रभाव कमी करण्यासाठी वैयक्तिक आणि सामूहिक कृतीबद्दल जागरूकता करण्यात आली.

यावेळी उपस्थितांना जागतिक तापमान वाढ आटोक्यात ठेवण्यासाठी करावयाच्या उपाय योजनांची माहिती देण्यात आली. तसेच वाढत्या उष्माघाताच्या प्रमाणामुळे होणारे दुष्परिणाम व घ्यावयाची काळजी याबाबत  शाळांमध्ये माहिती देण्यात आली.

वैद्यकिय आरोग्य विभागाचे मुख्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या सुचनेप्रमाणे मोठ्या प्रमाणावर होणारे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, पाणी प्रदूषण या संदर्भातील माहिती शाळांमधील विद्यार्थ्यांना व जनसमुदायांमध्ये देण्यात आली. याचबरोबर वैद्यकिय आरोग्य विभागाच्यावतीने 12 नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये तसेच चार नागरी आरोग्य वर्धिनी केंद्रामध्ये तसेच  बाह्य लसीकरण सत्रांदरम्यान  समुदाय आणि वैयक्तिक पातळीवर आरोग्य आणि हवामान कृतीबद्दल जागरूकता करण्यात आली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडको महामंडळाचा सदनिकाधारकांसाठी निर्णय