पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान’ उपक्रमाचे आयोजन

स्वयंसहाय्यता बचत गटामधील  महिलांना पनवेल शहरांमधील जलशुध्दीकरण केंद्रास भेट देण्याची संधी

पनवेल : केंद्र शासनाच्या गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार  मंत्रालयाच्यावतीने अमृत २.० अभियान अंतर्गत, दिनांक ०७ नोव्हेंबर ते ०९ नोव्हेंबर २०२३ या कालावधीत जल दिवाळी साजरी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानूसार पनवेल महानगरपालिकेच्यावतीने आयुक्त गणेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली  राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या सहकार्याने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान’ या उपक्रमाचे आयोजन दिनांक 8 नोव्हेंबर रोजी करण्यात येतआहे.

या अभियानांतर्गत स्वयंसहाय्यता बचत गटामधील  महिलांना पनवेल शहरांमधील जलशुध्दीकरण केंद्रास भेट देण्याची संधी मिळणार आहे. या भेटी दरम्यान महिलांना घरोघरी स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याच्या विविध प्रक्रियांची माहिती देण्यात येणार आहे. याचबरोबर नागरिकांना उच्च-गुणवत्तेचे पाणी मिळेल याची खात्री करून घेणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेच्या चाचणी प्रक्रियेबद्दलही त्यांना शिक्षित केले जाईल. पाण्याच्या पायाभूत सुविधांबाबत महिलांमध्ये आपलेपणा आणि मालकीची भावना वाढवणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे. शिवाय या भेटींमुळे महिलांना मुलाखतींच्या माध्यमातून संवाद साधण्याची संधी निर्माण होणार आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘आदिवासी भवन'चे महापालिका आयुक्त नार्वेकर यांच्या हस्ते लोकार्पण