नव्या आराखड्यात ठाण्यातील उद्यानाचे चांगभले 

नव्या आराखड्यात ठाण्यातील १४४ उद्यानांचा समावेश - उद्याने होणार चकाचक 

ठाणे शहरातील उद्यानांचे नूतनीकरण करण्यासाठी राज्य शासनाने सुशोभीकरणासाठी तब्बल ७५ कोटींचा निधी दिला आहे. याच निधीतून उद्यानावर खर्च होणार असून सुशोभीकरण करण्यात येणार आहे. यासाठी ठाणे पालिका प्रशासनाने आराखडा तयार केलेला आहे. याच आराखड्यात शहरातील तब्बल १४४ उद्यानाचा समावेश आहे. यामुळे आता ठाण्यातील उद्याने कात टाकणार आहे. उद्यानांची दुरावस्था होऊ नये म्हणून आराखड्यात उद्याची निगा आणि देखभालीसाठी लक्ष देण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे ठाण्यातील उद्याने ही चकाचक होणार असल्याची माहिती पालिका सूत्रांची आहे. 
 
ठाणे शहरात अनेक उद्याने आहेत. यात काही उद्यानात रोज येणाऱ्या ठाणेकरांची संख्याही मोठी आहे. तलावांचे आणि उद्यानांचे शहर अशी ओळख असलेल्या ठाणे शहरात अनेक उद्याने ही सुशोभीकरण, निगा, देखभाल अशा कारणामुळे दुरावस्थेत आहेत. या उद्यानात नागरिकांनी आपुलकीने यावे यासाठी उद्यानाचे सुशोभीकरण याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याने ठाणे महानगर पालिकेने उद्यानाच्या नूतनीकरणासाठी एकात्मिक उद्यान विकास कार्यक्रमांतर्गत पालिकेने प्रस्ताव तयार केला होता. या प्रस्तावावर पालिकेने राज्य शासनाला उद्यानाच्या नूतनीकरणासाठी ६० कोटींचा निधीही गरज असल्याचे नमूद केले होते. या प्रस्तावावर राज्य शासनाने हिरवा कंदील दाखविलेला असून  रस्ते, सुशोभिकरण, कळवा रुग्णालयाचे सक्षमीकरण आणि महापालिका मुख्यालय इमारत उभारणीपाठोपाठ उद्याने विकसित करण्यासाठी ७५ कोटींचा निधी मिळाला आहे. राज्यशासनाने दिलेल्या निधीतून आता ठाण्यातील दुरावस्थेत असलेल्या उद्याचे चांगभले आणि सुंदर उद्याने होण्याची शक्यता आणि उद्यानाचे रूप पालटण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. 
 
पालिका आयुक्तांनी घेतली उद्यान विभागाची बैठक 
 
ठाणे पालिकेने तयार केलेल्या उद्यान सुशोभीकरणाचा आराखडा यामध्ये १४४ ठाण्यातील शहरातील उद्यानाचा समावेश करण्यात आला आहे. ठाणे महापालिका आयूक्त अभिजीत बांगर यांनी उद्यान विभागाची नुकतीच बैठक घेऊन त्यात १४४ उद्यानांच्या नुतनीकरणासाठी तयार केलेल्या आराखड्याची माहिती घेतली. तसेच या उद्यानांची दूरूस्ती केल्यानंतर त्याची निगा व देखभाल ठेवण्यासाठी कोणत्या उपाय योजना करता येऊ शकतात, याचाही आढावा घेतला. उद्यानाच्या सर्वेक्षणात प्रशासनाने उद्याच्या वर्गवारीनुसार विविध गट तयार केले अ ,ब, क आणि ड या चार गटात उद्यानांची  संख्या आणि उद्यानाचा होणार वापर हे लक्षात घेण्यात आलेले आहे. 
 
अस्तित्वातील उद्यानाचे केले विविध गट 
 
पालिका प्रशासनाने आराखयात समाविष्ट केलेल्या उद्यानाच्या आवश्यकता आणि किती सुधारणा करणे आवश्यक आहे याचा अभ्यास करून विविध अ ,ब, क आणि ड या चार गटात उद्यानांचे वर्गीकरण करण्यात आलेले असून यावरून उद्यानाचा सध्या स्थिती आणि करावयाच्या सुधारणांचा डज येतो या गटांमध्ये अ या गटात उद्यानाची संख्या-२४ एवढी आहे. तर ब गटात ४६ एवढी संख्या आहे. क गटात मोठ्या प्रमाणात दुरुस्ती आणि सुधारणा करण्याची गरज असून अशा उद्यानांची संख्या ४४ आहे. तर ड गटात ज्या उद्यानांची कामे सुरु आहेत, त्यांचा समावेश करण्यात आला असून अशा उद्यानांची संख्या १८ इतकी आहे. 
 
उद्यान देखभाल, निगा यासाठी ३ वर्षाचे प्रयोजन
 
राज्य शासनांकडून निधी मिळाल्यानंतर ठाणे पालिका प्रशासनाने वेगाने हालचाली सुरु करून उद्यानाचा कायापालट करणायचा निर्धार केला. विविध वर्गवारीत उद्यानांची विभागणी केल्यानंतर उद्यानाला किती रुपये खर्च अपेक्षित आहे याचा अंदाज घेऊन नूतनीकरण कार्नाय्त आयेणर आहे. ता दुसरीकडे उद्यानावर खर्च करून सुशोभीकरण, इतर साहित्य बसविल्यानन्तर त्या उद्याची देखभाल आणि निगा राखण्यासाठी ठेकेदाराला ठेका देण्यात इयर आहे. सदरचा ठेका हा तीन वर्षासाठी देण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांची आहे. 
 
 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिकेच्यावतीने ‘पाण्यासाठी महिला, महिलांसाठी पाणी अभियान’ उपक्रमाचे आयोजन