पनवेलमध्ये जाई फाऊंडेशन आणि शब्दवेल यांचे एक दिवसीय साहित्य संमेलन साजरे ​​​​​​​

जाई फाऊंडेशन आणि शब्दवेल यांच्या कार्यक्रमात पारितोषिक वितरण व पुस्तक प्रकाशन

पनवेल : जाई फाउंडेशन संचालित शब्दवेल साहित्य मंच द्वारा कलिमाता सभागृह, नवीन पनवेल येथे आयोजित एकदिवसीय साहित्य संमेलन साजरे झाले. या संमेलनात जाहिरात विरहित सर्जनशीलतेचा नवाविष्कार दिवाळी अंक -२०२३ चे संमेलनाचे अध्यक्ष आणि सुप्रसिद्ध कवी, गीतकार  दीपक कांबळी यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले. याप्रसंगी कार्याध्यक्ष डॉ.वर्षा खडसे-रणदिवे आणि प्रमुख अतिथी म्हणून तसेच राज्य कर उपायुक्त एम. एस. कासार, सल्लागार तथा राज्यकर उपायुक्त अंजली ढमाळ उपस्थित होते. यावेळी आबासाहेब कडू लिखित गुवाहाटी एक्सप्रेस या लघु कादंबरीचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.  

यात पहिल्या सत्रात शब्दानंद कविसंमेलन घेण्यात आले. त्यात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पनवेलसह पुणे, मराठवाडा, नागपूर येथील कवींनी सहभाग घ्ोवून विविधांगी कविता सादर केल्या. वास्तविक विषयावर आपली स्पष्ट भूमिका मांडून सजग समाजनिर्मितीसाठी लिहित राहावे अशी भूमिका मान्यवर ववत्यांनी यावेळी मांडली. या सोहळ्याचे सूत्रसंचालन अश्विनी अतकरे व मनिषा शिरटावले यांनी केले. प्रकाशन सोहळ्यात शब्दवेल महाविजेता स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानित करण्यात आले. शब्दानंद कविसंमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ कवी-समीक्षक शिवाजी गावडे तर प्रमुख अतिथी कमलाकर  राऊत आणि शंकर घोरसे होते. तर सूत्रसंचालन अमोल चरडे यांनी केले. दुपारच्या सत्रात अक्षरलेणी कवि संमेलनामध्ये हास्यकवी नितीन वरणकार यांच्या अध्यक्षतेखाली प्रा.संजय कावरे, सुरेश नागले, नलिनी पवार, ललिता गवारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या निमंत्रितांच्या कविसंमेलनात हास्याच्या लकेरी उडाल्या. याप्रसंगी ढीगभर लिहिण्यापेक्षा  मूठभर..पण दर्जेदार लिहिण्याचा आणि अभ्यासपूर्ण लिहिण्याचा सल्ला ज्येष्ठ साहित्यिक सुरेश नागले यांनी उपस्थितांना दिला. या सत्राचे सूत्रसंचालन जयमाला चव्हाण यांनी केले. शेवटच्या सत्रात सर्व निमंत्रित कवी व कार्यकारिणी सदस्य यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. केंद्रीय संघटक देवेंद्र इंगळकर यांनी आभार प्रदर्शन व ईश्वरी अतकरे हिने सादर केलेल्या विश्व प्रार्थनेने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शब्दवेलचे अध्यक्ष प्रविण बोपूलकर, सचिव अश्विनी अतकरे ,सहसचिव रामदास गायधने, केंद्रीय संघटक देवेंद्र इंगळकर, युथ विंग अध्यक्ष अमोल चरडे, रायगड जिल्हाध्यक्ष विलास पुंडले, उपाध्यक्षा योगिनी वैदू आणि संघटक प्रतिभा मंडले यांनी मेहनत घेतली. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नव्या आराखड्यात ठाण्यातील उद्यानाचे चांगभले