पोटभाडेकरु बसवून ‘मार्जिनल स्पेस'चा वापर

दुकानासमोरील मोकळ्या जागेत बेकायदा व्यवसाय

खारघर ः खारघर शहरातील दुकानांसमोरील मोकळ्या जागेत (मार्जिनल स्पेस) काही व्यावसायिकांनी अनधिवृÀत व्यवसाय थाटला आहे. तर काहीं व्यावसायिकांनी ५ ते १० हजार रुपये दरमहा भाडे आकारुन पोटभाडेकरु बसवून ‘मार्जिनल स्पेस'चा बेकायदा वापर करायला सुरुवात व्ोÀली आहे. त्यामुळे खारघर मधील नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.
खारघर वसाहत मधील दुकानांसमोरील मोकळ्या जागा व्यावसायिकांनी व्यापल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना पदपथांवरुन ये-जा करताना विविध समस्यांना सामोरे जावे लागते. खारघर सेक्टर-७ मधील बँक ऑफ इंडिया कडून घरकुल कडे तसेच नवरंग कडून गोखले शाळा मार्गे उत्सव चौक तसेच डेली बाजार कडून जलवायूकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला दुकाने आणि मार्केट असल्यामुळे या परिसरात खरेदीसाठी ग्राहकांची मोठी वर्दळ असते. या परिसरातील दुकानदारांनी दुकानांसमोरील मोकळ्या जागांवर अतिरिक्त व्यवसाय करण्याच्या अनुषंगाने विविध व्यवसाय थाटले आहेत. तर काही हार्डवेअर, कापड विक्री आणि इतर दुकानदार ‘मार्जिनल स्पेस'चा गैरवापर करुन या जागेत व्यवसाय करत असल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत होत आहे. तर स्वीट मार्ट, हॉटेल, रेडिमेड कपडे विक्री व्यावसायिक ५ ते १० हजार रुपये दरमहा भाडे घ्ोऊन पोटभाडेकरु बसवून मार्जिनल स्पेसचा बेकायदा वापर करीत आहेत. त्यात दिवाळी काही दिवसांवर आली आहे. त्यामुळे खरेदीसाठी नागरिक बाहेर पडत आहेत. त्यात व्यावसायिक मार्जिनल स्पेस मध्ये सामान विक्रीसाठी ठेवत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. दरम्यान, याबाबत पनवेल महापालिका खारघर प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांच्याशी संपर्क केला असता, होवू शकला नाही.
पनवेल महापालिका अस्तित्वात आल्यावर तत्कालीन महापालिका आयुक्त सुधाकर शिंदे यांनी मोहीम राबवून ‘मार्जिनल स्पेस'चा बेकायदा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर दंडात्मक कारवाई केली होती. त्यामुळे ‘मार्जिनल स्पेस'चा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले होते. त्यानंतर महापालिकेकडून ‘मार्जिनल स्पेस'चा वापर करणाऱ्या व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मोहीम राबविल्याचे चित्र दिसले नाही.
खारघर परिसरातील बहुतांश भागात दुकानदार मार्जिनल स्पेस मध्ये दुकानातील साहित्य विक्रीसाठी ठेवत आहेत. त्यामुळे पनवेल महापालिका प्रशासनाने ‘मार्जिनल स्पेस'चा गैरवापर करणाऱ्या व्यावसायिकांविरुध्द मोहीम हाती घ्ोवून व्यावसायिकांनी व्यापलेली ‘मार्जिनल स्पेस'ची जागा मोकळी करण्याची गरज आहे. - नंदू वारुंगसे, शिवसेना (उबाठा गट) उपशहर प्रमुख - खारघर. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ परिसरातील सिडको वसाहतीच्या रस्त्यावरील क्रिव्ोÀट, उद्यान-क्रीडांगणातील गैरप्रकार बंद करा