नेरुळ परिसरातील सिडको वसाहतीच्या रस्त्यावरील क्रिव्ोÀट, उद्यान-क्रीडांगणातील गैरप्रकार बंद करा

 रस्त्यावरील क्रिव्ोÀट, उद्यान-क्रीडांगणातील गैरप्रकार बंद करा

नवी मुंबई ः नेरुळ, सेक्टर-४ परिसरातील सिडको वसाहतीच्या अंर्तगत भागातील रस्त्यावर खेळले जाणारे क्रिकेट यामुळे स्थानिक रहिवाशांना होणारा त्रास,
महापालिका विभाग कार्यालयासमोरील उद्यान-क्रीडांगणात होणाऱ्या दारुच्या पाटर्या, अंमली पदार्थांचे खुलेआमपणे केले जाणारे सेवन याविरोधात ‘नवी मुंबई जिल्हा काँग्रेस'च्या सचिव विद्या भांडेकर यांनी मोहीम उघडली असून यासंदर्भात त्यांनी नेरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक तसेच महापालिका नेरुळ विभाग कार्यालय यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. याद्वारे विद्या बांडेकर यांनी पोलिसांनी नेरुळ, सेवटर-४ परिसरात गस्त वाढविण्याची तर नेरुळ विभाग अधिकाऱ्यांनी उद्यान-क्रीडांगणात सुरक्षारक्षकांची संख्या वाढवून तेथील असामाजिक वृÀत्य थांबविण्याची मागणी यांनी केली आहे.

नेरुळ, सेक्टर-४ परिसरातील सिडको वसाहती मधील अंर्तगत रस्त्यावर मुले मोठ्या प्रमाणावर बॉक्स टाईप क्रिकेट खेळतात. यामुळे या ठिकाणाहून ये-जा करणाऱ्या रहिवाशांना आणि वाहन चालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना आणि महिलांना बॉल लागून जखमाही झाल्या आहेत. याशिवाय क्रिकेट खेळणारी काही मुले या ठिकाणी खुलेआमपणे सिगारेट ओढताना तसेच दारु पिताना पहावयास मिळतात. यामुळे स्थानिक रहिवाशांना आपल्या घराच्या खिडक्या बंद कराव्या लागतात. याशिवाय या परिसरात विभाग कार्यालयानजिक असणाऱ्या उद्यान-क्रीडांगणामध्येही खुलेआमपणे दारुच्या पाटर्या होत असतात. काही युवक नशापाणी तसेच चरस, गांजाचे सेवन करताना
निदर्शनास आले आहेत. रस्त्यावर क्रिकेट खेळणाऱ्या मुलांकडून उघड्यावरच दारु पिणे, सिगारेट ओढणे याशिवाय महापालिका उद्यानात होणाऱ्या दारुच्या पाटर्या आणि अंमली पदार्थांचे सेवनामुळे नेरुळ, सेक्टर-४ मधील सामाजिक स्वास्थ्य संकटात सापडले असून या ठिकाणी कायदा-सुव्यवस्थेचाही प्रश्न निर्माण होण्याची भिती आहे. सदर समस्येचे गांभीर्य पाहता पोलीस प्रशासनाने तात्काळ  सदर परिसरात पोलीस गस्त वाढवून होणारे गैरप्रकार संपुष्ठात आणून स्थानिक जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी विद्या भांडेकर
यांनी निवेदनातून नेरुळ पोलिसांकडे केली आहे.

नेरुळ, सेक्टर-४ परिसरातील विभाग अधिकारी कार्यालयासमोर असलेल्या उद्यान-क्रीडांगणामध्ये खुलेआमपणे दारुच्या पाटर्या झडताना दिसतात. काही युवक नशापाणी तसेच चरस, गांजाचे सेवन करताना पहावयास मिळत आहे. या उद्यान-क्रीडांगणामध्ये स्थानिक रहिवाशांना कधीही सुरक्षा रक्षक आढळून येत नाही. त्यामुळे या ठिकाणी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढविल्यास
क्रीडांगण-उद्यानात होणारे अवैध प्रकार बंद होतील. त्यामुळे
महापालिव्ोÀच्या वतीने सदर उद्यान-क्रीडांगण येथे तातडीने उपाययोजना करुन
स्थानिक जनतेला दिलासा देण्याची मागणी विद्या भांडेकर यांनी केली नेरुळ
विभाग अधिकाऱ्यांकडे व्ोÀली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात कुणबी, मराठा कुणबी व कुणबी मराठा जातीचे पुरावे तपासणी मोहीम युद्धपातळीवर सुरू