सानपाडा येथील उद्यानातील खेळणी, बाकांची दुरवस्था

तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी

वाशी : नवी मुंबई महापालिका उद्यान विभागातील ठेकेदारांना उद्यान विभाग अधिकाऱ्यांचा चांगलाच आशीर्वाद भेटत आहे. त्यामुळे नवी मुंबई शहरातील उद्यान आणि दुभाजकातील उद्यानांची देखभाल दुरुस्ती अभावी पुरती दुरवस्था झाली आहे.

देखभाल, दुरुस्ती न केल्याने सानपाडा सेक्टर-७ मधील संत शिरोमणी तुकाराम महाराज उद्यानाची देखील दुरवस्था झाली आहे. या उद्यानातील लहान मुले-मुलींची खेळणी, वृध्दांना विश्रांतीसाठी असलेले लाकडी बाकडे तुटलेले आहेत. त्यामुळे संत शिरोमणी तुकाराम महाराज उद्यान मधील तुटलेली खेळणी, लाकडी बाकडे या साहित्याची तात्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी ‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना'चे सानपाडा विभाग अध्यक्ष योगेश शेटे यांनी महापालिका तुर्भे विभाग अधिकारी तसेच सहाय्यक आयुक्त भरत धांडे  यांना निवेदन देऊन केली आहे. यावेळी योगेश शटे यांनी उद्यानातील खेळणी, बाकडे यांच्या दुरुस्तीबाबत भरत धांडे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वीज कंत्राटी कामगारांचा मंत्रालयावर मोर्चा