सीबीडी मधील ‘आदिवासी भवन'चे शनिवारी लोकार्पण

आ. मंदाताई म्हात्रे यांच्या आमदार निधीतून ‘आदिवासी भवन'ची उभारणी

नवी मुंबई : ‘बेलापूर'च्या आमदार सौ. मंदाताई म्हाते यांच्या विकास निधीमधून सीबीडी, सेवटर-८ मधील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे आदिवासी भवन उभारण्यात आले आहे. या ‘आदिवासी भवन'चा लोकार्पण सोहळा उद्या ४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांच्या उपस्थितीत नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्या हस्ते संपन्न होत आहे.

दरम्यान, या ‘आदिवासी भवन'च्या उद्‌घाटन प्रसंगी आदिवासी जीवनशैलीतील नृत्य आणि लोकनृत्याचा अनोखा संग्राम जपत कमल आनंद कला मंच आणि आशिमिक कामठे प्रस्तुत ‘वारसा माझ्या महाराष्ट्राचा' असा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमाला नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन आमदार सौ. मंदाताई म्हात्रे यांनी केले आहे.

नागर संस्कृती पासून दूर आणि अलिप्त राहिलेले सबंधित प्रदेशातील मुळचे रहिवासी म्हणजे आदिवासी बांधव, असे सामान्यप्रमाणे म्हणता येईल. सर्वसाधारण जंगलात, दुर्गम दऱ्या-खोऱ्यात आणि संस्कृत समाजापासून तुटक असलेल्या प्रदेशात आदिवासी तुरळक वस्ती करुन राहतात. नागर संस्कृतीचा त्याप्रमाणे वर्गश्रेणीबध्द समाजाचा संपर्क न झालेल्या वैशिष्ट्यपूर्ण चालीरिती किंवा संस्कृती आदिवासींमध्ये आढळतात. परंतु, आदिवासी बांधवांना आपली संस्कृती जपत आपले सांस्कृतिक कार्यक्रम कायम अजरामर राहावे म्हणून सीबीडी, सेवटर-८ येथील स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान येथे आदिवासी भवन उभारण्यात आले आहे, अशी माहिती आ. सौ. मंदाताई म्हात्रे यांनी दिली.

बेलापूर क्षेत्रातील सीबीडी, सेक्टर-८बी मधील आदिवासी बांधवांना त्यांचे पारंपारिक कार्यक्रम साजरे करण्याकरिता तसेच त्यांच्या समाजाची बैठक घेण्याकरिता आदिवासी भवन असावे अशी त्यांनी माझ्याकडे मागणी केली होती. या मागणीचा विचार करुन आदिवासी बांधवांकरिता माझ्या आमदार निधीमधून सदर ‘आदिवासी भवन'ची उभारणी केली आहे. त्यामुळे सीबीडी मधील आदिवासी बांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. -आमदार सौ. मंदाताई म्हात्रे, बेलापूर.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

घनकचरा व्यवस्थापनात नवी मुंबई होणार अधिक सक्षम