नवी मुंबई महापालिकेतील ८ अधिकारी-कर्मचारी सेवानिवृत्त

अनुभवी अधिकारी-कर्मचारी यांची सेवानिवृत्ती एक प्रकारे संस्थेची हानी -आयुक्त राजेश नार्वेकर

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेतील सहा.आयुक्त महेंद्र सप्रे, कार्यकारी अभियंता सुनिल लाड, प्रशासकीय अधिकारी अरविंद उरसळ, सुधाकर लोहार, रोहिदास जाधव तसेच मुख्याध्यापक व्यंकटेश कांबळे, प्राथमिक शिक्षक कामिनी आंग्रे, पद्माकर पाटील असे ८ अधिकारी-कर्मचारी नियत वयोमानानुसार ३१ ऑवटोबर रोजी सेवानिवृत्त झाले. या ८ अधिकारी-कर्मचारी यांचा आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या शुभहस्ते शाल, पुष्पगुच्छ आणि सन्मानपत्र प्रदान करुन विशेष गौरव करण्यात आला.

याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा-सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त ललिता बाबर, शिक्षण विभागाचे उपायुक्त दत्तात्रय घनवट, सहा. संचालक नगररचना सोमनाथ केकाण, महापालिका सचिव चित्रा बाविस्कर, अतिरिक्त शहर अभियंता मनोज पाटील, शिरीष आरदवाड आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

सेवानिवृत्ती प्रत्येक कर्मचाऱ्याच्या जीवनातील अपरिहार्य बाब असते. मात्र, अनुभवी कर्मचारी सेवानिवृत्त झाल्याने त्या संस्थेच्या कामकाजात अशा कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवते. यामुळे अनुभवसंपन्न कर्मचारी सेवानिवृत्त होणे एकप्रकारे त्या संस्थेची हानी असून ती भरुन निघायला काही कालावधी जातो. चांगले कार्यक्षम अधिकारी सेवानिवृत्त होत असून आज संमिश्र भावनांचा समारंभ असल्याचे मत आयुवत नार्वेकर यांनी यावेळी व्यक्त केले.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पार्किंग समस्या, वाहतूक कोंडीमुळे ‘ठाणे'करांची गैरसोय