‘कविता डॉट कॉम'च्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी भरली रंगत

रा. फ. नाईक महाविद्यालयात ‘कविता डॉट कॉम'चा सोळावा मासिक कार्यक्रम सादर

नवी मुंबई : आमच्या काळी बालवयात कविता कानावर पडणे, स्वतः सादर करणे, कवीमंडळींना भेटणे हे शवय होत नसे. आता मात्र दिवस चांगले येत असून मुले धिटाईने काव्य सादर करतात. या कवितांच्या माध्यमातून मुलांवर चांगल्या संस्कारांचे रोपण होत असल्याने कवितावाचनाचे कार्यक्रम जागोजागी व्हायला हवेत असे प्रतिपादन ह.भ.प.संजय शिरसाट यांनी केले. २९ ऑवटोबर रोजी कोपरखैरणे यातील रा.फ.नाईक महाविद्यालयात कविता डॉट कॉम या संस्थेच्या सोळाव्या मासिक काव्यवाचनाच्या कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘दै. आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत होते.

यावेळी प्रसाद माळी या छोट्या विद्यार्थ्याने धिटाईने कविता सादर तर केलीच; पण परिसा शिवशरण, सावी यादव, स्वराली यादव या लहानग्यांनीही कविता, गीत चालीसह गाऊन उपस्थितांचे लक्ष वेधले. नेहा माळी, माधवी मोतलिंग, रुपाली लटके, अनिल सकपाळ, सुरेंद्र पालवे, रश्मी राऊत, अक्षता गोसावी, वैशाली वऱ्हाडी यांनीही आपापल्या रचना यावेळी सादर केल्या. योग्य त्या वयात चांगल्या कविता ऐकायला मिळणे, मुलांचा कल लक्षात घेऊन त्यांना पालकांकडून-शिक्षकांकडून योग्य ते मार्गदर्शन मिळणे महत्वाचे असून कविता डॉट कॉमच्या माध्यमातून प्रा.रविंद्र पाटील, जितेंद्र लाड, वैभव वऱ्हाडी, नारायण लांडगे, रुद्राक्ष पातारे व त्यांचे सर्व सहकारी हे काम समाधानकारकरित्या काम करत असल्याबद्दल घरत यांनी अध्यक्षीय भाषणातून हर्ष व्यवत केला व पुढील कार्यक्रमांसाठी सुयश चिंतिले. यावेळी नाट्यकर्मी रविंद्र औटी यांनी नटसम्राट नाटकातील एक प्रवेश सादर केला. सावी यादव या चिमुरडीच्या काव्यवाचनाबद्दल उपस्थितामधील अनिलकूमार उबाळे यांनी तिला १०१/रु.चे रोख पारितोषिक प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते देऊ केले. नारायण लांडगे यांनी शेरो शायरीयुवत सूत्रसंचालन करुन कार्यक्रमात रंगत भरली. तर वैभव वऱ्हाडी यांनी आभार मानले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘सिडको'मध्ये ‘दक्षता जनजागृती सप्ताह'चा शपथविधीने प्रारंभ