‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक'चे प्रकाशन

कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंक साहित्य-सांस्कृतिक वैभव - संजय मोने

नवी मुंबई : जागतिक पातळीवरील सर्वाधिक खपाचे प्रकाशन ‘कालनिर्णय'ने गतवर्षी आपल्या सुवर्ण महोत्सवी वर्ष साजरे केले तर त्यांच्या कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी अंकाला ३० वर्षे पूर्ण झाली. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी'चे प्रकाशन, ‘पाकनिर्णय पाककला स्पर्धा २०२४'चा पारितोषिक वितरण समारंभ आणि ‘संगीत मैफिली'चे आयोजन २७ ऑवटोबर रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. शिवाजी पार्क येथील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकात सायंकाळीपार पडलेल्या या समारंभाला प्रख्यात अभिनेते सुकन्या आणि संजय मोने, ज्येष्ठ पत्रकार भक्ती चपळगांवकर, ‘कालनिर्णय'चे जयराज साळगांवकर, जयेंद्र साळगांवकर, शक्ती साळगांवकर, आदि उपस्थित होते.

यावेळी ‘कालनिर्णय सांस्कृतिक दिवाळी'चे प्रकाशन मोने दाम्पत्य, भक्ती चपळगांवकर यांच्या हस्ते झाले.

दिवाळी अंक प्रत्येकाची प्रत्येक गरज पुरविणारा आहे. आज इथे कालनिर्णय सांस्कृतिक अंक प्रकाशित झाला आणि पाककला स्पर्धेची पारितोषिके वितरीत झाली. त्याअर्थी साहित्य-संस्कृतीचा एक आगळा मेळ इथे जुळून आला, असे संजय मोने यावेळी म्हणाले.

यावेळी पद्मविभूषण आशा भोसले यांनी अजरामर केलेली गाणी तरुण गायकांनी सादर केली. या ‘सांगितिक मैफली'मध्ये शाल्मली सुखटणकर, राधिका नांदे, सोनाली कणिक, अभिषेक नलावडे यांनी सहभाग घेतला. तर कुणाल रेगे यांनी निवेदन केले. यावेळी सामाजिक, नाट्य, चित्रपट क्षेत्रातील अनेक मान्यवरउपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘कविता डॉट कॉम'च्या कार्यक्रमात चिमुकल्यांनी भरली रंगत