साहेबराव ठाणगे लिखित ‘सोयरे सकळ' पुस्तकास पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल गौरव
‘नवे शहर' मधून चांगभले सदर लिहीणाऱ्या साहेबराव ठाणगे यांचा सत्कार
नवी मुंबई : वाशी येथील ज्येष्ठ साहित्यिक आणि दै. ‘आपलं नवे शहर'मधून ‘चांगभले' हे सदर चालवणारे लेखक साहेबराव ठाणगे यांच्या ‘सोयरे सकळ' या व्यक्तिचित्र संग्रहास कोकण मराठी साहित्य परिषदेचा अनंत काणेकर पुरस्कार जाहीर झाला आहे.
२८ ऑवटोबर रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभाग्रहात, काकासाहेब पुरंदरे पत्रकारीता पुरस्कार वितरण समारंभात राज्याचे कॅबिनेट मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री. ठाणगे यांचा सन्मान करण्यात आला.