उरण रेल्वे स्थानकाजवळ पाईप लाईनला गळती

उरण रेल्वे स्थानकाजवळील ‘एमआयडीसी'च्या पाईप लाईनला गळती

उरण : उरण शहर, एनएडी सारख्या प्रकल्पांना पाणी पुरवठा करणाऱ्या ‘एमआयडीसी'च्या पाईप लाईनला उरण रेल्वे स्थानकाजवळ मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले आहे.

उरण शहरातील नागरिकांना आणि एनएडी सारख्या प्रकल्पांना ‘एमआयडीसी'च्या माध्यमातून रानसई धरणातून पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, ‘एमआयडीसी'च्या दुर्लक्षितपणामुळे वारंवार पाणी पुरवठा करणाऱ्या पाईप लाईनला गळती लागण्याच्या घटनामध्ये वाढ होत आहे. त्यातच उरण शहराजवळ नव्याने निर्माण होऊ घातलेल्या उरण रेल्वे स्थानकाजवळील संरक्षण भिंतीच्या मध्यभागी असलेल्या ‘एमआयडीसी'च्या सदर पाईप लाईनला गळती लागण्याची घटना घडली आहे. या पाणी गळती कडे ‘एमआयडीसी'चे अभियंता तसेच रेल्वे प्रशासनाने जाणूनबुजून दुर्लक्ष केल्याने दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

यंदा राज्यात पावसाळ्यात पडलेल्या पावसाचे प्रमाण कमी असल्याने धरणातील पाणीसाठा कमी आहे. त्यामुळे यावर्षी नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणी टंचाईचा सामना करावा लागणार आहे. त्यात एमआयडीसी आणि रेल्वे प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे रानसई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात वारंवार लागणाऱ्या गळती मुळे झपाट्याने घट होणार आहे. त्यामुळे एमआयडीसी आणि रेल्वे प्रशासनाच्या अधिकारी वर्गाने झोपेचे सोंग न घेता पाईप लाईनला लागलेली गळती थांबविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल महापालिकेची भरती प्रक्रिया होणार पारदर्शक