नवी मुंबईतील मातीचा अमृत कलश व्हाया ठाणे दिल्लीकडे रवाना

उपक्रमात नवी मुंबईकरांकडून देशप्रेमाचे, एकात्मतेचे दर्शन -आयुवत नार्वेकर

नवी मुंबई : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाची सांगता होत असताना केंद्र सरकारच्या वतीने ‘माझी माती माझा देश' अर्थात ‘मेरी माटी मेरा देश' असा देशव्यापी उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सर्व नागरिकांना मातृभूमी प्रेमाच्या धाग्याने जोडणारा ‘अमृत कलश यात्रा'चा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.

या अंतर्गत नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील आठही विभागांमध्ये अमृत कलश यात्रा काढून तेथील घराघरांतून संकलित केलेली माती विभागीय अमृत कलशात एकत्र करण्यात आली. याकरिता त्यांनी आपापल्या क्षेत्रात अमृत कलशाची उत्सवी स्वरुपात यात्रा काढून विभागांतील घरोघरी जाऊन या कलशांमध्ये घराघरांतील, विभागीय परिसरातील माती संकलित केली.

विभाग स्तरावरील माती संकलन केलेले अमृत कलश मुख्यालय स्तरावर आणताना आठही विभागातील मध्यवर्ती स्थळी नागरिकांनी पारंपारिक वेशभूषेत नटून थटून यात्रेत सहभाग घेतला. विभागांमधील ‘अमृत कलश यात्रा' बँड तसेच पारंपारिक वाद्ये वाजवित परिसरामध्ये फिरविण्यात आली. पंचप्रण शपथ घेऊन सुरु झालेल्या या विभागीय यात्रेमध्ये स्थानिक लोकप्रतिनिधी, विद्यार्थी तसेच नागरिकांनी मोठया प्रमाणावर सहभाग घेतला. या आठही आठ अमृत कलशांची विद्यार्थी आणि नागरिकांची बँडपथके, विद्यार्थ्यांची लेझीम पथके याद्वारे महापालिका मुख्यालय पर्यंत मिरवणूक काढण्यात आली.

सदर आठही कलश उत्सवी स्वरुपात यात्रा काढून महापालिका मुख्यालयात विशेष समारंभ आयोजित करुन मुख्यालय स्तरावरील अमृत कलशात एकत्र करण्यात आली. नवी मुंबई महापालिका मुख्यालय स्तरावरील आठही विभाग कार्यालय क्षेत्रातील संकलित केलेल्या मातीचा अमृत कलश २६ ऑवटोबर रोजी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सजवलेल्या वाहनाद्वारे रवाना झाला.

यावेळी राजेश नार्वेकर यांनी झेंडा दाखविल्यानंतर ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे रवाना झालेल्या सदर ‘अमृत कलश यात्रा'प्रसंगी अतिरिक्त आयुक्त विजयकुमार म्हसाळ, प्रशासन विभागाचे उपायुक्त  शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, क्रीडा- सांस्कृतिक कार्य विभागाच्या उपायुक्त तथा उपक्रमाच्या नोडल अधिकारी ललिता बाबर, उद्यान विभागाचे उपायुुक्त दिलीप नेरकर, मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, मुख्य लेखा परीक्षक जितेद्र इंगळे, घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त डॉ. बाबासाहेब राजळे, अतिक्रमण विभागाचे उपायुक्त राहुल गेठे, परिवहन व्यवस्थापक योगेश कडुस्कर, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, शिक्षण विभागाचे उपायुक्त दतात्रेय घनवट, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांच्यासह इतर अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.

‘माझी माती, माझा देश उपक्रमाच्या माध्यमातून नवी मुंबई महापालिका तर्फे पहिल्या टप्प्यात वसुधावंदन, ‘शिलाफलकम्‌, पंचप्रणशपथ, ‘शहीद वीरांच्या कुटुंबियांचा सन्मान असे नानाविध उपक्रम भव्यतम स्वरुपात राबविले. नेरुळ मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथे ७५ देशी वृक्षरोपांची लागवड करीत अमृत वाटिका निर्माण करण्यात आली. तर दुसऱ्या टप्प्यात मिरवणुकीद्वारे सांस्कृतिक दर्शन घडवित ‘अमृत कलश यात्रा'द्वारे घराघरांतून माती संकलन करण्यात आले. नवी मुंबईतील माती राजधानी दिल्लीत निर्माण होणाऱ्या अमृत वनामध्ये तसेच शहीद स्मारकासाठी वापरली जाणार असून अमृत कलश त्यासाठी रवाना झाला आहे. सदर उपक्रम यशस्वी करण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकांनी ज्या उत्साहाने सहभाग घेतला त्यामधून देशप्रेमाचे आणि एकात्मतेचे दर्शन घडले. नवी मुंबईकर नागरिकांचे आभार. - राजेश नार्वेकर, आयुवत - नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी बंद ठेवून माथाडी कामगारांचा मराठा आंदोलनाला पाठिंबा