उरण शहरातील अनाधिकृत भंगार डेपोत अग्नितांडव
कस्टमच्या जागेत बस्तान मांडलेल्या उरण शहरातील अनाधिकृत भंगार डेपोत अग्नितांडव
उरण : उरण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील बोरी पाखाडी येथील कस्टमच्या जागेत मोरा बंदर - उरण शहर रस्त्यावर बस्तान मांडलेल्या अनाधिकृत भंगाराच्या ( डेपोत) व्यवसायाला शुक्रवारी ( दि२७) सकाळी ठिक १०-४५ च्या सुमारास आग लागल्याची दुदैवी घटना घडली.सदर आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने अग्निशामक दलाच्या जवानांना शर्तीचे प्रयत्न करावे लागले आहे.यावेळी धुराचे लोट उंच उंच आकाशाला भिडले होते. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही.
शासकीय प्रशासन आणि नवीमुंबई पोलीस यंत्रणेच्या दुर्लक्षित पणामुळे आज उरण तालुक्यात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय नागरीकांनी शासकीय जागेवर आप आपले बस्तान मांडून बेकायदा व्यवसाय सुरू केला आहे. त्यामुळे वारंवार या तालुक्यात बेकायदा भंगाराच्या व्यवसायाला आग लागण्याच्या घटना घडत आहेत.उरण नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रातील बोरी पाखाडी येथील कस्टमच्या जागेत मोरा बंदर - उरण शहर रस्त्यावर बस्तान मांडलेल्या अनाधिकृत भंगाराच्या ( डेपोत) व्यवसायाला शुक्रवारी ( दि२७) सकाळी ठिक १०-४५ च्या सुमारास आग लागल्याची दुदैवी घटना घडली. सदर आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार, नरेश रहालकर, नितीन पाटील सह इतर रहिवाशांनी प्रसंग सावधगिरी बाळगून एन ऐ डी, सिडको, जेएनपीए आणि ओएनजीसी अग्निशमन दलाच्या जवानांना सदर घटनेची माहिती दिली.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटना स्थळावर धाव घेऊन आगीवर नियंत्रण आणण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. मात्र उरण शहरातील अरुंद रस्ते, बेशिस्त वाहतूक कोंडी यामुळे अग्निशमन दलाच्या वाहनांना काही ठिकाणी अडथळ्यांचा सामना करावा लागला आहे. आगीची तीव्रता मोठ्या प्रमाणात असल्याने धुराचे लोट उंच उंच आकाशाला भिडले होते. सुदैवाने जीवीत हानी झाली नाही. मात्र कस्टम च्या तसेच शासकीय भूखंडावर उभारण्यात आलेल्या अशा भंगार व्यवसायामुळे रहिवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे. सदर आगीवर नियंत्रण आणण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी हे स्वतः अग्निशामक दलाच्या जवानांना सहकार्य करण्यासाठी पुढे सरसावले होते. भंगार डेपोत केमिकल, विद्युत वाहक तारा असल्याने आग भडकली होती.आग कशा मुळे लागली ते कारण स्पष्ट झाले नाही
आग कशामुळे लागली हे कारण स्पष्ट झाले नाही.तसेच कोणत्याही प्रकारची जीवीत हानी झाली नाही. भंगाराच गोदाम हे अनाधिकृत आहे.आगीवर नियंत्रण आणण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान शर्तीचे करत आहेत. एकंदरीत उरण बायपास रस्ता लवकरच झाला असता तर अग्निशमन दलाच्या गाड्याना अडथळा निर्माण झाला नसता तरी बायपास रस्ता लवकर लवकरात होणे हे गरजेचे आहे - डॉ उध्दव कदम तहसीलदार - उरण