वृक्षप्रेमी आबा रणवरे यांचा मातोश्रींसमवेत राज्यस्तरीय सन्मान

ब्ल्यु स्टार सामाजिक आणि बहुउद्देशिय संस्थेतर्फे गुणवंतांचा सत्कार

नवी मुंबई : जुईनगर येथील वृक्षप्रेमी आणि वनस्पतीजन्य औषधांचे उपचारक आबा रणवरे, त्यांच्या मातोश्री श्रीमती कमल विठ्ठल रणवरे, दै. ‘आपलं नवे शहर'चे उपसंपादक राजेंद्र घरत यांच्यासह लक्षणीय कामगिरी करणाऱ्यांना ब्ल्यु स्टार सामाजिक आणि बहुउद्देशिय संस्था, पंढरपूर यांच्या वतीने गौरवण्यात आले. पंढरपूरातील विठ्ठल इन हॉटेल येथे २२ ऑवटोबर रोजी पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी विचारमंचावर संविधान प्रतिष्ठान-अवकलकोट चे प्रमुख तुकाराम दुपारगुडे, ब्ल्यु स्टार संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष विमल बनसोडे, कळंब येथील महाराष्ट्र बँकेचे व्यवस्थापक राजकुमार कांबळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे पंढरपूर तालुका अध्यक्ष हनमंत ननवरे आदि मान्यवर उपस्थित होते.

शिक्षण, आरोग्य, पत्रकारिता, समाजसेवा, रुग्णसेवा आदि क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या पंचवीस व्यवतीमत्वांची माहिती घेत त्यांना शाल, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते त्यांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मनिषा गायकवाड यांनी केले. चांगले संस्कार करुन पुढची पिढीही कर्तबगार होईल यासाठी दक्ष राहिलेल्या तीन ज्येष्ठ नागरिकांना आदर्श माता, आदर्श पिता पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यात ९२ वर्षीय श्रीमती कमल विठ्ठल रणवरे तसेच पुणे येथील श्रीमती आशा वसंत सुकाळे, पंढरपूर येथील भारत काशीनाथ जाधव यांचा समावेश होता. निरलसपणे आपले विहित कार्य करतानाच समाजाला वेगवेगळ्या प्रकारे उपयोगी ठरणाऱ्या व्यवितमत्वांचा गौरव केल्याबद्दल पुरस्कार विजेत्यांनी आपल्या मनोगतांतून समाधान व्यवत केले आणि ब्ल्यु स्टार सामाजिक व बहुउद्देशिय संस्थेचे आभार मानले. प्रा. दत्तात्रय गायकवाड यांनी नेटके सूत्रसंचालन केले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘दि. बा. पाटील ऊर्जास्थान' चळवळ स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव