‘दि. बा. पाटील ऊर्जास्थान' चळवळ स्पर्धेतील विजेत्यांचा गुणगौरव


‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'च्या सामाजिक कार्य अहवालाचे सादरीकरण

नवी मुंबई : ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चा ५वा वर्धापन दिन वाशी मध्ये मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यावेळी ‘संस्था'च्या वतीने घेण्यात आलेल्या ‘लोकनेते दि. बा. पाटील ऊर्जास्थान' या चळवळ स्पर्धेच्या माध्यमातून ‘दिबां'चे कार्य साहित्य आणि कला स्वरुपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सन्मान आमदार गणेश नाईक, ‘दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी खासदार संजीव नाईक, ‘दिबां'चे सुपुत्र अतुल पाटील, आयोजक दशरथ भगत, आदिंच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

दरम्यान, केंद्र आणि राज्याच्या विविध सरकारी योजनांचा लाभ थेट नवी मुंबईतील नागरिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी ‘दिवंगत करसन भगत शासकीय योजना केंद्र'चे उद्‌घाटन यावेळी करण्यात आले. नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थांना उचित मदत करणे, स्वच्छ भारत अभियानास सहाय्य म्हणून शून्य कचरा योजना कार्यान्वित करणे, त्यात प्रामुख्याने ‘स्वच्छ भारत अभियान'मध्ये कार्यरत असणारे सफाई कर्मचारी आणि कचरा वेचक महिला आदिंचा विशेष सन्मान वर्धापन दिन सोहळ्यात करण्यात आला. तसेच लोकनेते दि.बा.पाटील ऊर्जास्थान या स्पर्धेतील स्पर्धकांना स्पर्धेबाबत सखोल आणि परिपूर्ण माहिती सहज प्राप्तीसाठी ैैै.्‌ीेप्ीीूप्ंप्ीुीू.म्दस् या वेबसाईटचेही उद्‌घाटन गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले.

नवी मुंबईतील शहरी भागातील गावे या मूळ जन-जाती भूमीपुत्रांसह, शहरातील आणि झोपडपट्टी भागातील विविध बाधित घटकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी ‘पुनर्वसन संस्था'ची वाटचाल यापुढेही अविरत सुरु राहील. ‘नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्था'ने सामाजिक बांधिलकीतून केलेली विकासकामे, नवी मुंबईतील जनतेच्या न्याय हक्कासाठी केलेली आंदोलन, मोर्चे आदि कार्याचे सादरीकरण यावेळी करण्यात आले.

‘दि. बा. पाटील ऊर्जास्थान स्पर्धा'मध्ये १२ हजारांहुन अधिक संख्येने सर्वसामान्य नागरिक, शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी तसेच विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी सहभाग घेतला. अद्यापही स्पर्धाकांचे अर्ज येत  असल्याने त्यांना प्रोत्साहन आणि आशीर्वाद देऊन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष दशरथ भगत यांनी पुन्हा केले आहे.  

दि. बा. पाटील चळवळ स्पर्धेला मिळत असलेला वाढता उस्फुर्त प्रतिसाद लक्षात घेता यातील चित्रकला, लेख, स्फूर्तिगीत लेखन, ऑडिओ, व्हिडीओ, दि. बा. पाटील यांचे दुर्मिळ फोटो (अल्बम), वृत्तपत्र कात्रणे (न्यूज पेपर कटींग), चित्रीकरण (व्हिडीओ शुटींग), दि .बा .पाटील यांचे हस्तलिखित पत्र, ‘दिबां'च्या आंदोलन आणि संघर्षांवर माहितीपट स्पर्धा, शॉर्ट फिल्म आदि साहित्य आणि कला स्वीकारण्याची अंतिम तारीख वाढवून ती २० डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आली असल्याचे दशरथ भगत यांनी यावेळी सूचित केले.

तर सदर कार्यक्रम सर्वांनी पूर्ण क्षमतेने यशस्वी केला आहे. त्याचप्रमाणे यापुढील चळवळ स्पर्धेचे दुसरे चरण आणि आगामी स्पोर्टस्‌ फेस्टीव्हलचे काम त्वरित चालू करावे लागेल, असे मनोगत समाजसेवक संदीप करसन भगत यांनी व्यवत केले. दशरथ भगत अष्टपैलू व्यक्तिमत्त्व - आ. गणेश नाईक      

लोकनेते दि. बा. पाटील यांचा समाजपट, त्यांचे कार्य, त्यांची तळमळ, चळवळ लोकांसमोर आणण्यासाठी दशरथ भगत यांनी आपला वाढदिवस झाकून ठेवत सर्वांगीण समाजसेवेचा आदर्श आज सर्वांसमोर दाखवला. आजवर जी जी आंदोलने दशरथ भगत यांनी केली ती सर्व आंदोलने यशस्वी करुन दाखवताना त्यांनी आपल्यातील अष्टपैलू नेतृत्वगुण सिध्द केला आहे. मी दशरथ भगत यांच्या पाठीमागे कायम उभा आहे, असे गौरवोद्‌गार आ. गणेश नाईक यांनी यावेळी काढले.

‘दि. बा. पाटील चळवळ' स्पर्धा अनोखी असून नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नांव मिळणारच. तो स्थानिक आणि संपूर्ण भारतातील प्रकल्पग्रस्त, कामगार, कष्टकरी, भूमीपुत्रांचा सन्मान असेल, अशी अपेक्षा आ. गणेश नाईक यांनी बोलताना व्यक्त केली.

देशातील प्रकल्पबाधितांची जनगणना होणे गरजेचे- दशरथ भगत
देशातील जल, जंगल आणि जमिनी कसूर उदरनिर्वाह करणाऱ्या कष्टकरी, शेतकरी आदिंना प्रकल्पबाधित केले जात आहे. विविध प्रकल्पासाठी त्यांची वर्षानुवर्ष उदरनिर्वाह असणारी साधने हिरावून घेतली जात आहेत. असे असताना २०१३ रोजीच्या कायद्यांतर्गत देशातील प्रकल्प बाधित घटकांचे मूल्यांकन होत नाही. त्यांना शिक्षण, रोजगार, नोकरी आदिपासून वंचित ठेवले जात आहे. देशातील प्रकल्पबाधित नागरिकांची स्वतंत्र्य जनगणना होणे गरजेचे असल्याची ठोस भूमिका ‘पुनर्वसन समिती'चे अध्यक्ष दशरथ भगत यांनी यावेळी मांडली.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरण मधील रेल्वे स्थानकांच्या नामांतराची मागणी