अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची स्थापना !

अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक ज. वि. पवार तर सरचिटणीसपदी सुनील हेतकर, संदेश पवार यांची निवड

नवी मुंबई : कोकणातील आंबेडकरी व परिवर्तनवादी चळवळीतील साहित्यिक - कलावंतांनी एकत्र येऊन 'सम्यक संवाद' या ग्रुपची निर्मिती केली होती. त्यातूनच या सर्व साहित्यिक, कलावंतांना एकत्रित करण्यासाठी 'अपरान्त साहित्य कला प्रबोधिनी' या नव्या संघटनेची स्थापना करण्यात आली. या संघटनेच्या अध्यक्षपदी दलित पॅंथरचे सहसंस्थापक व ज्येष्ठ साहित्यिक, आंबेडकरी विचारवंत ज. वि. पवार यांची तर सरचिटणीसपदी साहित्यिक सुनील हेतकर व पत्रकार संदेश पवार यांची निवड करण्यात आली आहे. 

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची नुकतीच एक विशेष बैठक मुंबईत डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे पार पडली. या बैठकीस कोकणातील सर्व सातही जिल्ह्यातील आंबेडकरी चळवळीतील तसेच पुरोगामी - परिवर्तनवादी चळवळीतील साहित्यिक - कलावंत उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीमध्ये संस्थेचे नामाभिदान व कार्यकारणी मूक्रर करण्यात आली. 

या बैठकीत जाहीर करण्यात आलेली संस्थेची केंद्रीय कार्यकारणी पुढील प्रमाणे - अध्यक्ष ज .वि. पवार (मुंबई ), कार्याध्यक्ष प्रा. आनंद देवडेकर (ठाणे), सरचिटणीस सुनील हेतकर (सिंधुदुर्ग), संदेश पवार (रत्नागिरी ), उपाध्यक्षपदी सुधीर जाधव (मुंबई), प्रा. आशालता कांबळे (मुंबई उपनगर), प्रा. विजय मोहिते ( ठाणे), डॉ. संजय खैरे (रायगड), संजय गमरे (रत्नागिरी), प्रा. राजेंद्र मुंबईकर (सिंधुदुर्ग), संदेश गायकवाड (पालघर) यांची तर चिटणीसपदी सुनील जाधव (राजापूर), प्रदीप नाईक (नवी मुंबई) प्रा.अश्विनी तोरणे (मुंबई ), विठ्ठल कदम (सिंधुदुर्ग), कोषाध्यक्षपदी दीपक पवार (मुंबई ), हिशेब तपासणीसपदी प्रदीप जाधव (ठाणे) राष्ट्रपाल सावंत (रत्नागिरी ) तर सल्लागार म्हणून जेष्ठ साहित्यिका 'आयदान 'कार उर्मिला पवार (मुंबई), 'सोनबा' कार रमाकांत जाधव (मुंबई ), शिवाजी सोनवणे (पालघर) , कायदेशीर सल्लागार अॅड. धम्मकिरण चन्ने यांची निवड करण्यात आली आहे.

कार्यकारणी सदस्य म्हणून डॉ. श्रीधर पवार , इंजि. अनिल जाधव, किशोर कासारे ,संध्या तांबे, कविता मोरवणकर , प्रा. कांता कांबळे, अंजेला धामणकर , मारुती सपकाळ, बी.एस.जाधव , सिद्धार्थ देवधेकर, प्रा. सिद्धार्थ तांबे, पत्रकार युवराज मोहिते, संदेश सावंत, बुद्धदास कदम, रविकांत देवगडकर, विजय जाधव, सुबोध मोरे , प्रा. ज्ञानोबा कदम, अशोक चाफे, गुणाजी काजिर्डेकर, छनक शिर्के तर साहित्य विभागप्रमुखपदी डॉ. सोमनाथ कदम, नाट्यविभाग प्रमुखपदी नाटककार अरुण कदम, कला विभाग प्रमुखपदी दीक्षा शिर्के व युवा विभाग प्रमुखपदी प्रतीक पवार यांची निवड करण्यात आली आहे.नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे, कार्यकर्त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन केले जात आहे.

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची स्थापना २२ मार्च २०२३ रोजी मुंबई येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, दादर येथे समस्त साहित्यिक, कलावंतांच्या उपस्थितीत करण्यात आली होती . त्यानंतर याच प्रबोधिनीच्या वतीने चिपळूण येथे पहिली सम्यक साहित्य कला संगीती मे महिन्यात यशस्वीपणे आयोजित करण्यात आली होती. संगीतीप्रमाणे दरवर्षी कोकणातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात सम्यक साहित्य कला संगीतीचे आयोजन करून साहित्यिक व कलावंतांना एक वेगळे विचारमंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्याचप्रमाणे संस्थेच्या वतीने विविध प्रकारचे साहित्यिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन, साहित्य कलावंतांना मार्गदर्शन, सहकार्य, विविध प्रकारच्या कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत. तालुका, जिल्हा, विभागीय अशा विविध स्तरावर कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. नव्या वर्षात अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीच्या वतीने दुसरी सम्यक साहित्य कला संगीती आयोजित केली जाणार असून त्याचे स्थळ लवकरच जाहीर केले जाईल, असे संस्थेचे अध्यक्ष ज.वि.पवार व सरचिटणीस सुनील हेतकर, संदेश पवार यांनी यावेळी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

संगीतभूषण पं. राम मराठे यांच्या तैलचित्राचे घाणेकर नाट्यगृह येथे अनावरण