शहिदांना नवी मुंबई पोलिसांचे अभिवादन

शहीद कुटुंबियांच्या उपस्थितीत शहिदांना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली

नवी मुंबई : लडाखमधील भारत चीन सीमेवर बर्फाळ प्रदेशातील "हॉट स्प्रिंग" या ठिकाणी २१ ऑक्टोंबर १९५९ साली सी.आर.पी. एफ चे जवान गस्त करीत असताना दबा धरून बसलेल्या चिनी सैनिकांनी त्यांच्यावर भ्याड हल्ला केला होता. या हल्यात सी.आर.पी.एफ. चे दहा जवान शहीद झाले. या शहीद जवानांच्या अतुलनिय शौर्यापासुन सर्वांना स्फुर्ती मिळावी, कर्तव्याची आणि राष्ट्रभक्तीची जाणीव व्हावी, त्यामुळे २१ ऑक्टोंबर हा दिवस पोलीस स्मृतिदिन म्हणून पाळला जातो.

पोलीस स्मृति दिवसाचे औचित्य साधुन शनिवारी हौतात्म्य प्राप्त झालेल्या शहीद जवानांना आदरांजली वाहण्यासाठी नवी मुंबई पोलीस आयुक्तालय स्तरावर परेडचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी शहीद कुटुंबियांना आंमत्रित करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये दिनांक १ सप्टेंबर २०२२ ते दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये कर्तव्यावर असताना दिवंगत झालेल्या एकुण १८८ पोलीस अधिकारी/जवानांचे स्मरण करण्यात आले. नमुद शहीदांना पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सह पोलीस आयुक्त संजय मोहिते, गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त यांच्या हस्ते तसेच इतर सर्व वरिष्ठ पोलीस अधिकारी, पोलीस अंमलदार, मंत्रालयीन अधिकारी/कर्मचारी, इतर मान्यवर व शहीद कुटुंबियांच्या उपस्थितीत पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीची स्थापना !