सीबीडी-बेलापूरच्या गावस्कर मैदानात होणार रावणाच्या चाळीस फुटी प्रतिकृतीचे दहन ​​​​​​​

श्री अलबेला मंदिर सेवा ट्रस्ट चाळीसाव्या वर्षानिमित्त करणार चाळीस फुटी रावणाच्या प्रतिकृतीचे दहन

नवी मुंबई : सीबीडी बेलापूर येथील श्री अलबेला मंदिर सेवा ट्रस्टचेे यंदा चाळिसावे वर्ष असल्यामुळे रावणाच्या चाळीस फुटाची प्रतिकृती उभारली असून विजयादशमीला सीबीडी बेलापूर येथील सुनील गावस्कर मैदानात त्याचे दहन केले जाणार आहे.

समाजात रावण प्रवृत्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून असंख्य रावण समाजात राजकारणात बेलगामपणे वागताना दिसतात आणि त्यांच्यातील रावणी प्रवृत्तीचे दर्शन घडत असते. समाजहित लक्षात घेता ही रावणी प्रवृत्ती कशी कमी करता ह्यासाठी समाज प्रबोधनाची गरज असल्याच्या विचाराने अलबेला हनुमान मंदिर सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पांडुरंग पाटील ह्यांच्या मार्गदर्शनाखाली अशा रावणाचे दहन करुन एक सकारात्मक संदेश देण्याचा प्रयत्न सदर संस्था करीत आहे. ट्रस्ट आयोजक प्रशांत पाटील ह्यांनीही सदर प्रतिकृती उभारण्यात योगदान दिले असून नवी मुंबईतील ही सर्वाधिक उंचीच्या रावणाची प्रतिकृती असल्याने म्हटले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अनधिकृत बांधकाम प्रकरण