‘दि.बा.पाटील ऊर्जास्थान चळवळ' स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ
पहिल्या टप्प्यातील स्पर्धकांचा दसरा दिनी गुणगौरव - दशरथ भगत
नवी मुंबई : ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चा ५वा वर्धापन दिन येत्या २४ ऑक्टोबर २०२३ सायंकाळी ४ वाजता वाशी मधील सिडको एक्सिबिशन सेंटर ऑडिटोरियम येथे होणार असून यावेळी ‘लोकनेते दि. बा. पाटील स्फूर्तीस्थान' अंतर्गत विविध १० प्रकारात घेतलेल्या चळवळ स्पर्धेच्या माधमातून ‘दिबां'चे कार्य साहित्य आणि कला स्वरुपात सादर केलेल्या गुणवंतांचा गुणगौरव सोहळा आयोजित करण्यात आला आहे. याप्रसंगी आमदार गणेशजी नाईक, माजी खासदार रामशेठ ठाकूर, ‘दि. बा. पाटील नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळ नामकरण सर्वपक्षीय कृती समिती'चे अध्यक्ष दशरथ पाटील, ‘दिबां'चे सुपुत्र अतुल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. त्याचबरोबर केंद्र केंद्र राज्याच्या विविध सरकारी योजनांचा लाभ थेट नवी मुंबईतील नागरिक लाभार्थ्यांना मिळावा यासाठी दिवंगत करसन भगत शासकीय योजना केंद्र स्थापन करण्याचा मानस असल्याची माहिती नवी मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते तथा ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे अध्यक्ष दशरथ भगत यांनी दिली.
दि. बा. पाटील ऊर्जास्थान स्पर्धेत १२ हजारांहुन अधिकारी संख्येने सर्वसामान्य नागरिक तसेच शाळा आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घ्ोतला आहे. अद्यापही स्पर्धकांचे अर्ज येत असल्याने त्यांना प्रोत्साहन आणि आशीर्वाद देऊन अधिक स्पर्धकांनी सहभाग घेण्याचे आवाहन पुन्हा करण्यात आले आहे. ‘दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा'ला उस्फुर्त प्रतिसाद मिळत असून तो वाढत आहे. त्यामुळे यातील चित्रकला, लेख, स्फुर्तिगीत लेखन, ऑडिओ, व्हिडीओ, लोकनेते दि. बा. पाटील यांचे दुर्मिळ फोटो (अल्बम), वृत्तपत्र कात्रणे (न्यूज पेपर कटींग), चित्रीकरण (व्हिडीओ शुटींग), ‘दिबां'चे हस्तलिखित पत्र, ‘दिबां'च्या आंदोलन आणि संघर्षांवर माहितीपट स्पर्धा, शॉर्ट फिल्म आदि साहित्य आणि कला स्वीकारण्याची अंतिम मुदत वाढवून ती २० डिसेंबर २०२३ पर्यंत करण्यात आली असल्याचे दशरथ भगत यांनी १९ ऑवटोबर रोजी आयोजित ‘पत्रकार परिषद'मध्ये सांगितले.
नवी मुंबईतील शहरी भाग, गावे या मूळ जन-जाती भूमीपुत्रांसह शहरातील आणि झोपडपट्टी भागातील विविध बाधित घटकांचा आवाज सरकार दरबारी पोहोचवण्यासाठी व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे. ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'ने सामाजिक बांधिलकीतून केलेली विकास कामे, नवी मुंबईतील जनतेच्या न्याय हक्कासाठी केलेली आंदोलन, मोर्चे, आदि कार्याचे सादरीकरण दसरा दिनी ‘संस्था'च्या वर्धापन दिन कार्यक्रमात करण्यात येणार आहे. नवी मुंबईतील विविध सामाजिक संस्थांना उचित मदत करणे, ‘स्वच्छ भारत अभियान'मध्ये शून्य कचरा योजना यंत्रणांबाबत संस्था प्रयत्न करणार आहे. त्यात प्रामुख्याने ‘स्वच्छ भारत अभियान'मध्ये कार्यरत असणारे सफाई कर्मचारी आणि कचरा वेचक घटक आदिंचा देखील वर्धापन दिन-गुणगौरव सोहळ्यात करण्यात येणार आहे, असे दशरथ भगत यावेळी म्हणाले.
‘लोकनेते दि. बा. पाटील ऊर्जास्थान' या स्पर्धेतील स्पर्धकांना स्पर्धेबाबत सखोल आणि परिपूर्ण माहिती सहज प्राप्तीसाठी २४ ऑक्टोबर रोजीच्या सोहळ्यात ैैै.्ीेप्ीीूप्ंप्ीुीू.म्दस् या वेबसाईटचे उद्घाटन करण्यात येणार असल्याचे देखील दशरथ भगत यांनी सांगितले.
सदर पत्रकार परिषद प्रसंगी ‘दि. बा. पाटील चळवळ स्पर्धा'च्या संयोजन समितीतील रविंद्र वाडकर, प्रशांत निगडे, किशोर पाटील, प्रवक्ते शैलेश घाग, डॉ. विवेक भोईर, सुधाकर लाड, गजआनन म्हात्रे, रामनाथ म्हात्रे, ‘नवी मुंबई पुनर्वसन सामाजिक संस्था'चे पदाधिकारी संजय यादव, देवेंद्र खाडे, वैजयंती भगत, वंदना घरत, हेमंत देसाई, आदि उपस्थित होते.