निर्माणाधीन बांधकामावरील क्रेन कोसळली; १ कामगार जखमी

कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर

वाशी : कोपरखैरणे सेक्टर-१० येथील एका पुनर्विकास बांधकामात साहित्य उचलणारी क्रेन कोसळण्याची घटना घडली आहे. सदर दुर्घटनेत एक कामगार जखमी झाला असून, त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. मात्र, या घटनेमुळे बांधकाम जागेतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

नवी मुंबई शहरात सध्या मोठ्या प्रमाणात पुनर्विकासाच्या बांधकामांनी सध्या जोर धरला आहे. कोपरखैरणे सेक्टर-१० मध्येही एका खाजगी विकासकाकडून बांधकाम सुरु असून, या ठिकाणी साहित्य हाताळणी करण्यासाठी एक क्रेन उभारली होती. १९ ऑवटोबर रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास काम सुरु असताना क्रेनच्या खाली लावलेले सॉकेट अचानक तुटल्याने क्रेन डाव्या बाजूला कलंडली आणि खाली पडली. क्रेन पडत असल्याचे समजताच चालकाने प्रसंगावधान राखत क्रेन मधून खाली उडी मारली. मात्र,  त्याच्या पायाला दुखापत झाली. त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. सदर बांधकाम शेजारी मोठी लोकवस्ती असून, नवरात्रोत्सव सुरु आहे. मात्र, क्रेन नाल्याच्या बाजूला पडल्याने मोठा अनर्थ टळला. परंतु, या घटनेमुळे बांधकाम जागेतील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘दि.बा.पाटील ऊर्जास्थान चळवळ' स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्याला २० डिसेंबर पर्यंत मुदतवाढ