कोकण विभागीय माहिती कार्यालय तर्फे ‘अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिका'ची निर्मिती

पुस्तिकेचे माहिती महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते प्रकाशन

नवी मुंबई : ‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'च्या कोकण विभागीय माहिती कार्यालय यांनी तयार केलेल्या ‘अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिका'चे प्रकाशन ‘माहिती-जनसंपर्क महासंचालनालय'च्या महासंचालक जयश्री भोज यांच्या हस्ते १८ ऑवटोबर रोजी मंत्रालय येथे करण्यात आले.
राज्यातील वत्तपत्रे, वृत्तसंस्था, इलेक्टॉनिक प्रसारमाध्यमांमध्ये वृत्तविषयक काम करणाऱ्या पत्रकार प्रतिनिधींना  अधिस्वीकृती पत्रिका देण्यात येते. यासाठी शासनाद्वारे विभाग आणि राज्यस्तरीय समित्यांची स्थापना करण्यात आली आहे. या प्रक्रियेची परिपूर्ण आणि विहित माहिती नसल्यामुळे पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेसाठी अर्ज करताना अडचणी येतात.  अपूर्ण भरलेले अर्ज आणि त्रुटींमुळे अर्ज नामंजूर होतात. परिणामी, पत्रकारांना अधिस्वीकृती पत्रिकेपासून वंचित राहावे लागते.  असे होऊ नये या करिता अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिका तयार करण्यात आली आहे. या पुस्तिकेत पत्रकारांना देण्यात येणाऱ्या अधिस्वीकृती पत्रिकेबाबतच्या शासन निर्णयांची सोप्या शब्दांत माहिती देण्यात आली आहे. सविस्तर शासन निर्णय/नियमावली पाहण्याकरिता पुस्तिकेत दिलेल्या बारकोडवर स्कॅन करुनwww.dgipr.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देता येऊ शकते.

‘अधिस्वीकृती संदर्भ पुस्तिका' प्रकाशनाच्या सदर छोटेखानी कार्यक्रमाप्रसंगी ‘माहिती व जनसंपर्क महासंचालनालय'चे संचालक (माहिती-प्रशासन) हेमराज बागुल, राहुल तिडके (माहिती-वृत्त, जनसंपर्क), उपसंचालक (वृत्त) दयानंद कांबळे, उपसंचालक (प्रशासन) गोविंद अहंकारी यांच्यासह कोकण विभागाचे उपसंचालक (माहिती) डॉ.गणेश मुळे उपस्थित होते.

सदर पुस्तिकेची निर्मिती कोकण विभागीय माहिती कार्यालयाच्या सहाय्यक संचालक संजीवनी जाधव-पाटील आणि उपसंपादक प्रविण डोंगरदिवे यांनी केली असून, या पुस्तिकेचे मुखपृष्ठ चित्रकार सुशिम कांबळे यांनी तयार केले आहे.  पुस्तिकेचे मुद्रण दै. कृषीवल, रायगड यांच्या सौजन्याने करण्यात आले आहे. सदर पुस्तिका केवळ खाजगी वितरणासाठी उपलब्ध आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिका आयोजित विचारमंथन व्याख्यानमालेतील दहावे पुष्प