उरणच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास

उरण नगर परिषद व उरण पोलीस यांची अनधिकृत विक्रेत्यांवर संयुक्त कारवाई 

उरण : उरण शहरातील रस्त्यांच्या दोन्ही बाजूला मोटारसायकल पार्किंग, अनधिकृत टपऱ्या हातगाड्याचे वावर हे वाढल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.त्याचा त्रास हा दैनंदिन नोकरदार, विद्यार्थ्यी, नागरिकांना सहन करावा लागत आहे.या संदर्भात उरण नगर परिषदेने कारवाईचा बडगा उगारावा अशी मागणी सातत्याने नागरिकांकडून करण्यात येत असून यासंदर्भात वृत्तपत्रात बातम्या ही प्रसिद्ध करण्यात आली.यांची दखल उरण नगर परिषद व उरण पोलीस यंत्रणेने घेऊन बुधवारी ( दि १८) संयुक्त कारवाईचा बडगा उगारला आहे.त्यामुळे उरण शहरातील रस्त्यांनी सध्या मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.

उरण नगरपालिका हद्दीतील अरुंद रस्त्यामुळे   शहरात गेले अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.शहरातील चार फाटा ते राजपाल नाका ,कोट नाका ते वैष्णवी हॉटेल, राजपाल नाका व कोट नाका ते उरण तहसील कार्यालय असे मुख्य रस्ते आहेत. या मुख्य रस्त्यावर अनधिकृत टपऱ्या हातगाड्या, वाहणे पार्किंग करुन ठेवलेली जात असल्याने वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे.तसेच रस्त्यावर नगरपालिकेच्या माध्यमातून वाहतूक कोंडीसाठी उपाययोजना म्हणून पांढरे पट्टे मारण्यात आले आहेत.

सध्या नवरात्री सणांचे  दिवस असल्याने नागरिकांची उरण बाजार पेठेत मोठी गर्दी निर्माण होत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी नगरपालिकेने नियोजन करावे आणि मोटारसायकल रस्त्याच्या एकाच  बाजूला लावून ठेवण्यासाठी नियोजन करावे अशी मागणी होत आहे.तसेच यासंदर्भात वृत्तपत्रात बातम्या ही प्रसिद्ध करण्यात आल्या,त्याची दखल उरण नगर परिषद व उरण पोलीस यंत्रणेने घेऊन बुधवारी ( दि १८) संयुक्त कारवाईचा बडगा उगारला आहे. त्यामुळे सध्या तरी शहरातील रस्त्यांनी मोकळा श्वास घेतल्याचे दिसून येत आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 लहरी हवामानाचा कांदा उत्पादनाला फटका