नवी मुंबईतील सुविधा प्रकल्प, समस्यांबाबत खा. राजन विचारे यांनी जाणली सद्यस्थिती

सुविधा कामे करताना सत्ताधारी, विरोधक दुजाभाव न करण्याची मागणी

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा समस्याबाबत तसेच महापालिकेकडे पाठपुरावा करुन नवी मुंबई शहरात सुरु केलेल्या विकास प्रकल्पांची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी  खासदार राजन विचारे यांनी ‘शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)'च्या शिष्टमंडळासोबत महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी विस्तृत चर्चा केली.

याप्रसंगी शिष्टमंडळात ‘शिवसेना'चे जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, द्वारकानाथ भोईर, नवी मुंबई महिला संघटिका सौ. रंजना शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख मनोज हळदणकर, एम. के. मढवी, दिलीप घोडेकर, प्रकाश पाटील, सुर्यकांत मढवी, मिलिंद सूर्यराव, शहरप्रमुख विजय माने, महानगर प्रमुख सोमनाथ वास्कर, चेतन नाईक, रतन मांडवे, समीर बागवान तसेच इतर शिवसेना पदाधिकारी आणि नागरिक यांचा समावेश होता.

नवी मुंबईतील शहरात वाढती दळणवळणाची सुविधा, शहराच्या लोकसंख्येत झपाट्याने होत असलेली वाढ यामुळे नागरिकांना मूलभूत पायाभूत सुविधा उपलब्ध होण्यासाठी आवश्यक असलेले उद्यान, मैदान, पार्किंग, रस्ते आणि इतर सुविधा भूखंड यांची भविष्यात कमतरता भासण्याची दाट शक्यता आहे. यासाठी शहराच्या विकास आराखड्यात सन २०३८ पर्यंतचा लोकसंख्या वाढीचा विचार करुन ‘सिडको'कडून ६०० नवीन  भूखंड मिळवण्यासाठी महापालिकेने केलेल्या प्रयत्नांबाबत खा. राजन विचारे यांनी आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केली.

नवी मुंबई शहरातील काही गांवठाण भागात आणि शहरी भागात जुन्या टाकलेल्या ड्रेनेज वाहिन्या आणि जलवाहिन्या बदलणे गरजेचे असल्याने महापालिकेने याबाबत योग्य पावले उचलावीत. तसेच बांधकामासाठी पिण्याचे पाणी वापरणाऱ्या बांधकाम व्यावसायिकांवर निर्बंध घालावे. घणसोली आणि कोपरखैरणे येथील कंडोमनियम अंतर्गत उभ्या राहिलेल्या वसाहती चाळीस वर्षाहून जुन्या झाल्याने त्यांच्या विकास साधण्यासाठी महापालिकेने धोरण अवलंबावे. दिघा आणि तुर्भे परिसरातील उर्वरित विद्युत वाहिन्या भूमीगत करुन घेणे. नवी मुंबई शहरात चर्मकार समाजाला रोजगारासाठी स्टॉल परवाने मिळून द्यावे. सानपाडा, सेवटर-१० मधील डी. व्ही. पाटील मास्तर मैदानात बसविण्यात येणारी खेळणी स्थानिकांच्या मागणीनुसार ओरिएंटल कॉलेजच्या मैदानात बसविणे. मोरबे धरणाची पाण्याची लाईन सानपाडा परिसरात घेण्यासाठी ‘रेल्वे'ची चर्चा करणे.  नेरुळ मधील ज्वेल ऑफ नवी मुंबई येथील तलावातून येणारी दुर्गंधी तातडीने दूर करणे. वाशीप्रमाणे कोपरखैरणे, सेवटर-६ ते ८ गुलाब डेअरी सन्स दरम्यान स्काय वॉकची निर्मिती करणे, आदि कामांबाबत खा. राजन विचारे यांनी आयुवत राजेश नार्वेकर यांच्याशी चर्चा केली. तसेच सत्ताधारी पक्षातील लोकप्रतिनिधींच्या प्रभागात जादा कामे करुन विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींच्या प्रभागात कामे करण्याबाबत महापालिका प्रशासनाने दुजाभाव करु नये, अशी विनंती करताना खासदार विचारे यांनी विरोधी पक्षांच्या लोकप्रतिनिधींच्या प्रभागातील कामांबाबत चर्चा करु असे फाईलवर रिमार्क मारुन कामे रोखण्याच्या प्रकाराबाबत आयुवत नार्वेकर यांच्याकडे तीव्र शब्दात नाराजी व्यवत केली.

दरम्यान, खा. राजन विचारे यांनी केलेल्या मागण्यांवर आणि सुचनांवर सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन आयुवत राजेश नार्वेकर यांनी यावेळी दिले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उरणच्या रस्त्यांनी घेतला मोकळा श्वास