भले बुरे ते घडून गेले       

२०२४ वर्ष संपत आलं. काही बदल, काही सुखासोबत काही दुःख काही वेदना देखील देऊन गेलं. भूतकाळ आपण बदलू शकत नाही. टूथपेस्टमधून बाहेर आलेलं ते पांढरे जेल उर्फ पेस्ट परत भरता येत नसते. फुटलेला अंडे परत जोडता येत नसतं. बारा महिने संपून गेले आहेत आता आपण त्याबाबत काहीच करू शकत नाही. पुढच्या वर्षाकडे थोडी आशा घेऊन बघू या.

 आयुष्य क्षणाक्षणाला पुढे जात असतं काही निर्णय चुकतात. काही संधी हुकतात. भले-बुरे काहीतरी घडून जातं. याबद्दल आपण खंत करत राहतो मनात ती वेदना रुतत राहते. वाटते, भय इथले संपत नाही.

 पूर्वीच्या काळी बऱ्याच नाटकांची सुरुवात सूत्रधाराने सांगितलेल्या स्वगत परिच्छेदाने व्हायची. असे या स्वगताचा काम, आजूबाजूच्या परिसराची नोंद, बॅकग्राऊंड समजणे वगैरे असायचं. पण ही सर्व स्वगते ही काहीतरी हेतू धरून केलेली असायची. माणसाच्या मनात असं २४ तास स्वागत-वार्तालापाचे स्वगत काम चालू असते. संगणकाचे एकावेळी अनेक स्क्रीन उघडे असावे आणि या एका पडद्यांवर काय चालू आहे हे आपण मधूनमधून डोकावून बघावं, एका अन्यावर काम करावे. दुसऱ्याचा विचार करावा, तशी स्वागत मनामनामध्ये चालू राहतात. या स्वगतांचा कधीकधी त्रास देखील होतो.

वाटते, हे भय कधीच संपणार नाही..
हा असो की तो असो,
जात कोणतीही असो
हे हे भय असंच आपला पाठलाग करत राहणार
उदाहरणार्थ मी काम करत असताना, विचार करते, अरे मी आता हे सगळं स्वयंपाक पाणी करते खरे, पण पाहुणे अचानकच आले नाही, त्यांचं येणं रद्द झालं तर!जेवून आले तर? हे माझे कष्ट वाया जातील का? मी स्वयंपाक घरातच रमले, राबले, अजून तर माझ्या चेहऱ्याला पाणी लावलेलं नाहीये, मी कशी दिसेल? शनिवारचा कार्यक्रम तर घ्ोतला आहे,कार्यक्रमाची तयारी नाही ते कसं होईल?.

 खूप थाटात लग्न केलं की, लोकांना ईर्षा होते. हेवा जाणवतो. नट, मोठे मोठे लोक थाटात लग्न केलेले, पुढे त्यांना दृष्ट होऊन ते संसार मोडतात. भावंडांमध्ये कुटुंबांमधल्या व्यक्तीच्या अनोळखीच्या नजरेची जी इर्षा अथवा जेलसी असते, ती माणसाला त्रास देत राहते. नातेसंबंध बिघडले, तर ती जखम फारच निराळी आणि खोल असते. यांचं कसं सगळं चांगलं झालं अशा नजरेने जे बघतात, ती नजरसुद्धा कधी कधी समजली उमगली की खटकत राहते.

 आदमी जो कहता है आदमी जो सुनता है जिंदगी भर वो सदा ये पिछा करती है!
असे विविध प्रश्न मनात चालू असतात. या सर्व स्वगतांची  तपासणी करायला हवी. माणसाचे मनात विचार,वारंवार वारंवार येत असतात. मन त्याला सर्व ठिकाणी सुविधा जनक वातावरण  हवं असते . पण दरवेळी ते शक्यच नसतं. वेगळेवेगळे प्रश्न येत असतात.

 या स्वगताची उलट तपासणी करताना, आपण स्वतःलाच विचारावं, की  घडलं हे वाईट घडलं का? पण याहून अधिक वाईट घडलं असतं, ते घडलं नाही. सगळं नीट असताना, हे असं का घडलं? हे माझ्या बाबतीत, घडत राहते. इत्यादी गोष्टींनी मन नकारात्मक होणार आहे, ठीक आहे. पण हे थोडंसं अतिशयोक्त आहे. आता या वयात, या प्रसंगात असं काही घडलं खरं, पण अजून आपण जिवंत आहोत. एकाकी नाही. आपल्या शरीराचे काही अवयव काम करत आहेत, हे ठीक आहे. एखादी वाईट घटना घडल्यावर वाटतं बरं झालं, निदान कुणीतरी आपल्या सोबत तरी आहे. संकटकाळी कोणीतरी मदतीचा हात पुढे करेल आणि अधिक सकारात्मक काहीतरी घडेल.

 नक्की काय घडाव हे देव ठरवतो. बरं जे वाईट घडायचं ते घडून गेलं आहे. ते तुम्ही बदलू शकत नाही. ते घडलं नसतं तर बरं झालं असतं. पण ते घडलंय ना, मग काय करणार? उपाय, एकच सत्य स्वीकारा.

 एका मैत्रिणीनी मोठं ऑपरेशन केलं. ऑपरेशन व्यवस्थित झालं. तरी पण त्या दरम्यान मोलकर्णीने प्रचंड त्रास दिला. घाणेरड्या गळक्या मळक्या कढईत, न घासलेल्या पितळी पातेल्यामध्ये, गवार वगैरे शिजवत असते. स्वयंपाक खाण्यालायक देखील, होईलच याची खात्री नसे. उंच हाइराइज मध्ये एका मोठ्या कॉम्प्लेक्समध्ये ती राहते, फोनवर स्विगीवर, सगळे मिळू शकत. तरी पण तिला मात्र घरचं खायचं होतं. त्यामुळे मोलकरणीला रस्त्यावर पाठवायचे. त्या बाईला, कडवे वाल खावेसे वाटायचे. तर मोलकरीण दुकानात जायचे. चोरीचे भय असे. सर्व वेगळ्या वेगळ्या प्रकारचे तणाव, ऑपेरेशन नंतर तिला यायचे. पंधरा दिवस जसे मिळेल तसे, ऑपरेशन झाल्यावर काही दिवस खायला काय हरकत होती? मोलकरणीने पैसे चोरले असं सांगते. थोडेफार चोरले ते पण ठीक आहे. निदान ऑपरेशन व्यवस्थित झालं आणि ही मैत्रीण धडधाकट पायावर उभी राहिली, ही किती सकारात्मक घटना आहे.

 माणसाला वाईट प्रसंगी तणाव येतो. त्याच्यात काही वावगं, अथवा चूक नाही. विवेकाने आपल्या स्वगतांची, मनातल्या विचारांची तपासणी करावी. थोडं सोसावं. मानसिक आरोग्य आपल्याला जपणे अतिशय आवश्यक आहे. समोरच्या व्यक्तीला आपल्याला दुःखी करणे, आपल्याला अस्वस्थ करणं, आवडतं. तसे झालो आणि आपण जर अस्वस्थ झालो, तर शत्रूचा तो विजय असतो.

 इतर कोणी आपल्याला अस्वस्थ करत नसतो, आपण स्वतःला अस्वस्थ करून घेतो. त्यामुळे आपल्याच मनावर आपण काम करावं आणि दुर्लक्ष करावं. मी जाणते.. सांगणे खूप सोप्पे आहे. याच्यावर अंमल करणे अतिशय अवघड आहे. शास्त्रज्ञ तर हे सहज सांगतात, पण हसत सांगतात,

अहो अगदी सोप्पं आहे. असं असं करा. सकारात्मक राहा.पण ते करण अवघड असतं.
 २०२४ वर्ष संपत आलं. काही बदल, काही सुखासोबत काही दुःख काही वेदना देखील देऊन गेलं. भूतकाळ आपण बदलू शकत नाही. टूथपेस्टमधून बाहेर आलेलं ते पांढरे जेल उर्फ उर्फ पेस्ट परत भरता येत नसते. फुटलेला अंडे परत जोडता येत नसतं. बारा महिने संपून गेले आहेत आता आपण त्याबाबत काहीच करू शकत नाही.

 पुढच्या वर्षाकडे थोडी आशा घेऊन बघू या.

 भले बुरे ते घडून गेले,
 विसरून जाऊ सारे क्षणभर,
 जरा विसावू या वळणावर!
- शुभांगी पासेबंद 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

भावनांचे बांध फुटू द्या..