३० वर्ष जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडीट करुन घेण्याचे आवाहन
माणूस कष्ट-मातीपासून दूर गेल्याने भोगतोय आजार व झालाय बेजार
आजच्या पिढीला कष्टाचे काम करण्याची सवय नाही किंवा मनाची तयारीही नाही. पूर्वी काम करण्यासाठी लोक रामप्रहरी शेतात गेल्यावर सकाळचा नाष्टा, दुपारचे जेवणही शेतावरच होत असे, सांज होता होता शेतकरी/शेतावरील कामकरी घरी येवून थोडा आराम करुन, देवळात किर्तनाला भजनाला जात असल्यामुळे त्याचा दिवभराचा शीणवटा उतरत असे. दिवसभर मेहनत केल्याने त्याला चांगली झोपही मिळत असे व पुरेशा झोपेमुळे व केलेल्या कष्टामुळे खाल्लेले अन्नही लवकर पचत असे. परिणामस्वरुप त्याचे शारीरिक स्वास्थ्य ठीक राहात असे. आजची परिस्थिती अगदी याउलट आहे.
आपल्या देशाला पूर्वीपासून गावखेड्यांचा देश म्हणून ओळखले जात होते. स्वातंत्र्याच्या ७७ वर्षात देशाचा विकास तर झाला आहे, पण आजही ७०% लोक गावातच राहतात. पण, आता लोकांची मानसिकता बदलत चालली आहे. बरीच मंडळी आपापली गाव, खेडे सोडून शहराकडे धावत सुटले आहेत. गाव खेड्यातील लहान आणि कुटीर उद्योग नष्ट होत चालले आहेत, म्हणण्यापेक्षा नष्ट झाली आहेत. याला कारणीभूत मोठी नोकरशाही जबाबदार असल्याचे बोलले जात आहे असे म्हणण्याचे कारण की, सरकार सामान्य जनतेच्या हितासाठी काही धोरणे राबवते तेव्हा, ही मधली मंडळी त्या धोरणाचा व त्यासाठी आलेल्या पैशाचा वापर मधल्या मध्ये करुन, आलेल्या रवकमेचा घोळ करतात व ते पैसे गरीबापर्यंत पोहचू देत नाहीत. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधींनी याबाबत सुतोवाच केले होते की, सरकार गरीबासाठी जो एक रुपया पाठवते तेव्हा त्यातील फवत १५ पैसे गरीबापर्यंत पोहोचतात. हे देशाचे व जनतेचे दुर्देव आहे. त्यात आजही काही विशेष फरक पडलेला नाही, तरीही जनता नेत्यांच्या पोकळ आश्वासनावर विश्वास ठेवून, परत-परत त्यांनाच निवडून देते.
त्यातच जनता आणि सरकार यांच्यातील दलाल मंडळी व नवधनिक वर्ग या जाती पैदा झालेल्या आहेत. मागील काही वर्षात सामान्य जनतेची हालत दिवसेंदिवस खराब होत चालली आहे. सामान्य जनता ‘बौना' होत चालली आहे. ही स्थिती कधी बदलेल? आमच्या देशातील नेत्यांनी जनतेला अनेक मोठ मोठी आश्वासने दिली. रोजगार देण्याच्या गोष्टी केल्या. महागाई कमी करण्याचे वायदे केले. तरुण-तरुणींना मोठ-मोठी स्वप्ने दाखवली. पण प्रत्यक्षात त्यांच्या हाती काय लागले? ही तरुण मंडळी आपल्या रोजी-रोटीच्य शोधात ‘दर दर' भटकत आहेत.
स्वातंत्र्यानंतर देशात जे नवे नेतृत्व उद्यास आले ते तर इतके स्वार्थी आणि भ्रष्ट निघाले की, त्यामुळे सामान्य जनतेच्या हालात आणखीनच भर पडली. मंत्री, मुख्यमंत्री व पंतप्रधानांवरही भ्रष्टाचाराचे आरोप केले जाऊ लागले, त्यात काही प्रमाणात तथ्यही आहे. अशा स्थितीत मधली नोकरशाही मंडळी गप्प कशी बसणार? ही मंडळी तर वाहत्या पाण्यात हात धुवायला सदैव मोकळी नेते खातात, आम्ही का खाऊ नये? ही धारणा.
यातून शिक्षकीपेशाही सुटलेला नाही. त्यांनीही शिक्षणाला व्यवसायाचे स्वरुप दिले आहे. शिक्षणाच्या या बाजारीकरणात अन्यायाचे शिकार झाले ते सामान्य गटातील विद्यार्थी, त्यांचा प्रामाणिकपणा काहीही कामाला आला नाही, पण ज्यांची पात्रता काहीही नसलेल्या, पण श्रीमंत आणि पैसेवाल्या विद्यार्थ्यांना मोठमोठ्या डिर्ग्या देवून, मोठमोठ्या पदावर बसवण्याचे काम होत आहे. त्यांच्याकडून काही चांगल्या अपेक्षा आपण कशा ठेवू शकतो?हीच स्थिती सरकारी हॉस्पिटलाची आहे. सरकार म्हणते सर्वांच्या आरोग्याची काळजी घेतली जाईल, त्यासाठीच्या सर्व सुविधा उपलब्ध केल्या जातील. हा सर्व ‘बोलाचा भात आणि बोलाची कडी' सारखा प्रकार आहे. जनसंख्येच्या आधारावर किती हॉस्पिटल तयार आहेत? आणि असले तरी किती हॉस्पिटलमध्ये डॉवटर्स, वैद्यकिय स्टाफसह दवा पुरेशी आहे? किती रुग्णांना सामान्य सुविधा मिळतात, हा संशोधनाचा विषय आहे. सरकारने शिक्षण व वैद्यकीय सेवा यासाठीच्या आपल्या आर्थिक तरतूदीत कमालीची कपात केल्याचे खासदारच सांगतात. विरोधी पक्षाने यावर फार मोठी वादावादी संसदेत केल्याचे समाजमाध्यमातून पहायला मिळाले.
देशात सर्वच क्षेत्रातील हालत खराब आहे. सर्व समाज नैतिक अवमुल्यग्रस्त होत चालला आहे. परिणामस्वरुप तो सर्वच दृष्टीने आजारी होत चालला आहे. गरीबी वाढत चालली आहे. त्यामुळे देशात अपराधीकरणही वाढत चालले आहे. या अपराधीकरणावर पोलिसांचा किंवा न्यायालयाचा धाक राहिलेला नाही. कारण हीच मंडळी जास्त भ्रष्ट आणि स्वार्थाच्या गर्तेत जास्त अडकलेली आहे. ही मंडळी सामान्य व न्यायप्रिय जनतेला, कायदा पाळणाऱ्याला संरक्षण देण्याऐवजी, अपराध्यालाच जास्त संरक्षण देण्यास धन्यता मानतात. परिणाम स्वरुप सामान्य जनता विविध आजारांची शिकार होत आहेत. उपचारासाठी शहराकडे धाव घेत आहेत. मात्र तिथेही त्यांना चांगला उपचार मिळत नाही. उलट नवनवीन आजाराचा अंगीकार करावा लागत आहे.
आज देशातील प्रत्येक गावा-शहरात रुग्णांची संख्या वाढत आहे व उपचाराच्या सुविधांची संख्या घटत आहे. यावर मार्ग कधी काढला जाणार? ही स्थिती सध्या तरी सरकारच्या हाताबाहेर गेली आहे. यावर माहितगार सांगतात की, ‘लोकांनी आता सरकारवर अवलंबून न राहता आपला पूर्वीचा मार्ग अवलंबावा. आपल्या मातीला जवळ करावे. आपल्या मातीशी एकरुप व्हावे. याचा अर्थ प्रत्येकाने आपल्या शरीराला मातीत, उन्हात कष्ट करण्याची सवय लावून घ्यावी.
आजच्या पिढीला कष्टाचे काम करण्याची सवय नाही किंवा मनाची तयारीही नाही. पूर्वी शेतात काम करण्यासाठी लोक रामप्रहरी जात असत. सकाळचा नाष्टा शेतावरच होत असे, दुपारचे जेवणही शेतावरच होत असे, सांज होता होता शेतकरी वा शेतावरील काम करी घरी येवून थोडा आराम करुन, देवळात किर्तनाला भजनाला जात असे. त्यामुळे त्याचे दिवभराचा कष्टाचा शीण उतरत असे, दिवसभर मेहनत केल्याने त्याला चांगली झोपही मिळत असे व पुरेशा झोपेमुळे व केलेल्या कष्टामुळे खाल्लेले अन्नही लवकर पचत असे. परिणाम स्वरुप त्याचे शारीरिक स्वास्थ्य ठीकठाक राहात असे.
आजची परिस्थिती अगदी या उलट आहे. आज सर्वांना सुखसुविधांची लत लागली आहे. थोडेही चालणे अवघड व कष्टाचे वाटत आहे. साधा किराणा आणायचा झाला तरी हाताशी गाडी, मग ती ‘टू व्हिलर असो फोर व्हिलर' असावी वाटते. थोडी चालण्याची तसदी घ्यावी असे वाटत नाही. परिणामस्वरुप शरीराला आवश्यक असलेला व्यायाम मिळत नाही, शरीरातील कॅलरीज वाढत जातात व त्याचा परिणाम विविध आजाराला आमंत्रण देण्यात होतो.
शहरात लोकांना विविध प्रकारच्या सुविधा आहेत. मात्र त्या ठराविक कॅटॅगरीतील लोकांनाच मिळतात आणि तेच लोक विविध आजाराचे शिकार होतात. हे नाकारुन चालणार नाही. आजही शहरात राहणारे व कष्टाचे काम करणाऱ्यात आजाऱ्यांचे प्रमाण कमी आहे. पण, बहुतांश लोकांना छोटे-मोठे आजार होतात, त्याला शुद्ध पाण्याचा अभाव, शुद्ध हवेचा अभाव, हेच मानले जातात. मात्र त्यावर घेतले जाणारे औषध किंवा दवा, गोळ्या पॉवरफूल घेतल्या जातात, ती औषधे आजार तर बरा करतात मात्र त्यांचे साईड इफेवट दुसऱ्या आजारास कारणीभूत ठरतात. ही शोकांतिका आहे.
यावर उपाय सांंगताना तज्ज्ञ म्हणतात माणसाने स्वास्थ्यासाठी ग्राऊडिंग हे लाभकारक आहे व बिघडलेल्या स्वास्थ्याला सुधारणारेही आहे. शरीरात असलेल्या सुजेस कमी करण्यासाठी, शरीराच्या वेदनेला कमी करण्यामध्ये आणि मूड सुधरविण्यासाठी ग्राऊन्डिंग महत्त्वाचे आहे. ग्राऊन्डिंग म्हणजे पृथ्वीतत्वाच्या जवळ राहणे, प्रकृतीच्या, निसर्गाच्या प्रत्यक्ष स्पर्शात राहणे, सिमेंट काँक्रीटच्या नाही तर जेथून झाड-पान उगू शकतील अशा नैसर्गिक स्थितीत असलेल्या जमिनीशी शरीराला प्रत्यक्ष जोडणे. गवताळ जमीन किंवा रेतीच्या स्पर्शात असणे म्हणजे ग्राऊन्डिंग. मुंबईकरांसाठी किंवा शहरीवासियांसाठी माती किंवा रेती दुर्लभ झालेली आहे. ज्याचा फारच वाईट परिणाम आपण भोगत आहोत. आपल्याला फिजिओथेरपीची गरज वाटू लागली आहे. पण आपण जर नैसर्गिक सानिध्यात राहून आपण आपली ब्लड सवयर्ुलेशन आणि एनर्जी सुधारु शकतो.
सध्या आपले नाते निसर्गाशी तुटत चालले आहे आणि दुसरं एवढ्या साऱ्या इलेवट्रॉनिक साधनामध्ये आपण रहात आहोत की, या साधनांच्या इलेवट्रो-मॅग्निटिक फिल्डच्या अति संपर्कात राहिल्यामुळे आपले शरीरही हाय होल्टेज अवस्थेत राहत असते. ज्याला कमी केले नाही तर आपल्याला अनेक आजार होण्याची शवयता असते. आपण रोज मॉर्निग वॉक किंवा ईव्हिनिंग वॉक करतो, पण ते पायात बूट घालूनच करत असतो, त्याचा आपल्याला प्रत्यक्ष काहीच फायदा होत नाही.
आपल्याला आपले आजार कमी करण्यासाठी पृथ्वीतत्वाशी संपर्क उपयोगी ठरतो. जमिनीशी संपर्क आल्यास आपल्या एनर्जी सायकलमध्ये येणारे बदल आपल्या सिस्टमला मजबूत बनवतात.
आज आपण नैसर्गिक व मानवनिर्मित आजाराचा सामना करत आहोत. त्याला आपण स्वतःच जबाबदार आहोत. आपली मनोवृत्ती ऐतखाऊ वा फुकटखाऊ बनत चालली आहे. त्यामुळे आपले सर्वच प्रकारचे स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यासाठी आपण सतत दुसऱ्याला जबाबदार ठरवत असतो.
यावर एक चारोळी महत्त्वाची ठरते.
‘घर मे बीमार है हाथ में तार है
इस तरह जिंदगी आज लाचार है।
हर कोई राह के बीच में चल रहा
जैसे औराें का कोई न अधिकार है।'
-भिमराव गांधले