प्रेरणेची ओंजळ..

पद्मश्री प्राप्त सुधा मूर्ती २०२४ पासून राज्यसभेवर आहेत. शिक्षण आणि गावाचा विकास महिलांना पुढे जाण्यात त्या योगदान देतात. अनावश्यक वस्तूंचा संग्रह करणं, भेट वस्तू न स्वीकारणे ठरवले. जे जगलं ते लिहिलं की पायवाट आपोआप तयार होते. हवेत चालणारे पायवाट निर्माण करत नाहीत. जमीनिशी व मातीशी नाळ जोडलेली असली तरच अद्वितीय असं काहीतरी घडतं. आपल्याभोवतीच विखुरलेल्या आदर्शांना एकत्र करून आपल्यालाच सुरेख रांगोळी बनवावी लागते. समाजाला सुधा मूर्ती यांनी ओंजळभर पाणीच दिले नाही, तर भरभरून दिले आहे.

 काही व्यक्तींचे जीवनच प्रेरणा असतं. प्रतिकुल परिस्थितीतून मार्ग काढणे म्हणजे चिखलातून पायवाट निर्माण करून इच्छित स्थळी पोहचणें. समाज सेविका आणि लेखिका सुधा मुर्ती या मुलांना नेहमी प्रोत्साहीत करत असतात. सामाजिक मुद्द्यांवर लक्ष देण्यासाठी सुधा मूर्ती ओळखल्या जातात.  पद्मश्री प्राप्त सुधा मूर्ती २०२४ पासून मध्ये राज्यसभेवर  आहेत. शिक्षण आणि गावाचा विकास महिलांना पुढे जाण्यात योगदान देतात. संपूर्ण जीवनाची प्रेरणा मिळते. ज्यामुळे मुलांमध्ये आत्मविश्वास वाढतो. सुधा मुर्ती यांनी मुलांच्या चांगल्या भवितव्यासाठी काही सोप्या टिप्स सांगितल्या आहेत.

कधीच आपल्या स्वप्नांना अर्धे सोडू नका.
सुधा मूर्ती सांगतात की जीवनात कधीच आपल्या स्वप्नांना अर्धवट सोडू नका. ते पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणी आल्या तरी हार मानू नका. मेहनत करत राहा आणि आपली स्वप्न पूर्ण करा. तुमच्या वागण्यातील हे बदल पाहून तुम्ही लहान मोठ्या गोष्टींना घाबरणं सोडाल.

नेहमी शिकत राहा
सुधा मूर्ती सांगतात माणसाने शिकणं कधीच सोडू नये. आयुष्यात नेहमीच नवनवीन गोष्टी होत होतात. टेक्नोलॉजीशी सोडून राहून नेहमीच स्वतःला अप टू डेट ठेवण्याचा प्रयत्न करा. शिकल्यामुळे मुलांचा ब्रेन सजग राहील आणि तुम्ही कायम आनंदी रहाल.

अयशस्वी होण्याला घाबरू नका
सुधा मुर्ती सांगतात की अयशस्वी व्हायला कधीच घाबरू नका. तुम्ही तुमच्या अपयशातून शिकून पुन्हा प्रयत्न केले पाहिजेत. अपयश हा यशाच्या मार्गाचा एक आवश्यक भाग आहे. मुलांनी त्यांच्या अपयशातून शिकले तर त्यांना आयुष्यात पुढे जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.

दुसऱ्याला महत्व द्या
सुधा मूर्ती सांगतात की फक्त आपल्याबद्दल विचार करणं योग्य नाही. आपण ज्या समाजात राहतो त्या समाजात इतर लोकही राहतात. त्यांची कदर करणंही गरजेचं असतं. स्वतःपुरता विचार करणारे लोक कधीच पुढे जाऊ शकत नाहीत. म्हणून दुसऱ्याच्या भावनांची कदर करा.

मुलांना वाढत्या वयात जबाबदारी समजावणं गरजेचं असतं. त्यामुळेच ते चांगले डिसिजन मेकर बनू शकतात. याशिवाय  मुलांना शक्तींचा चांगला विकास होईल. मुलांशी नेहमी संवाद साधत राहा. मुलांना पैश्यांची वॅल्यू समजावून सांगा. मुलांना गरजेशिवाय पैसे देऊ नका.

सुधा मुर्ती याविख्यात सामाजिक कार्यकर्त्या आणि कुशल लेखिका आहेत. सुधा मूर्ती या मराठी, कन्नड आणि इंग्रजी भाषेमधून लिखाण करतात. इन्फोसिस फाऊंडेशन या एक सामाजिक कार्य करणाऱ्या संस्थेच्या निर्मितीमध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. या संस्थेच्या त्या सह-संस्थापिका आहेत. इन्फोसिस फाऊंडेशनच्या माध्यमातून मूर्ती यांनी समाजाच्या विविध क्षेत्रांत विकासकामांना प्रोत्साहन दिले आहे. कर्नाटक सरकारच्या  शाळांत त्यांनी संगणक आणि ग्रंथालये उपलब्ध करून दिली आहेत. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठात मूर्ती क्लासिकल लायब्ररी ऑफ इंडिया या नावाचे ग्रंथालय सुरू केले आहे. कर्नाटकातील ग्रामीण भागांत आणि बंगलोर शहर व परिसरात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधली आहेत. तमिळनाडू आणि अंदमान येथे सुनामीच्या काळात त्यांनी विशेष सेवाकार्य केले आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी भागातील लोकांनाही संस्थेने मदत दिलेली आहे. त्यांनी विपूल लेखन केले. त्यांच्या प्रत्येक पुस्तकांच्या माध्यमातून स्वानुभवातून आलेला संदेश सर्वांना मिळतो.तीन हजार टाकें या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी कष्टकरी महिलांबद्दल आपली कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली. जटा निर्मूलन साठी केलेल्या कामाबद्दल महिलांनी त्यांना तीन हजार टाकें असलेली गोधडी भेट दिली. आपल्या जीवनातली ही अमूल्य भेट आहे असं त्यांनी सांगितलं. तीन ओंजळी पाणी या पुस्तकामध्ये त्यांनी आजीच्या आठवणी प्रित्यर्थ काशीला जाऊन अर्ध्य दिलें. तिसरी ओंजळ सोडतांना एक पण करायचा असतो. आपली आवडती गोष्ट सोडायची असतें. त्यांनी अनावश्यक वस्तूंचा संग्रह करणं, भेट वस्तू न स्वीकारणे ठरवले. जे जगलं ते लिहिलं की पायवाट आपोआप तयार होते. हवेत चालणारे पायवाट निर्माण करत नाहीत. जमीनिशी व मातीशी नाळ जोडलेली असली तरच अद्वितीय असं काहीतरी घडतं. आदर्श आपल्या भोवतीच विखुरलेले असतात, त्यांना एकत्र करून आपल्यालाच सुरेख रांगोळी बनवावी लागते. समाजाला सुधा मूर्ती यांनी ओंजळभर पाणीच दिले नाही तर भरभरून दिले आहे. - डॉ.अनिल कुलकर्णी 

Read Previous

कालीचरणचा प्रताप आणि जगभर छीः थू!

Read Next

माणूस कष्ट-मातीपासून दूर गेल्याने भोगतोय आजार व झालाय बेजार