होळीसाठी ठाणे पोलिस सज्ज  

ठाणे : होळी आणि धूलिवंदनासाठी ठाणे पोलिस दलाचा चोख बंदोबस्त पाच परिमंडळात महत्वाच्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. धूलिवंदनाच्या दिवशी ठाणे वाहतूक विभागाचे ७०० पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ठाणे आयुक्तालायच्या हद्दीतील परिसरात तैनात ठेवण्यात येणार असून धूलिवंदनाच्या दिवशी मद्य किंवा नशा करून वाहन चालविणाऱ्या चालकांवर बारीक नजर ठेवली जाणार असल्याची माहिती ठाणे शहर वाहतूक विभागाचे पोलिस उपायुक्त डॉ विनयकुमार राठोड यांनी दिली.

२४ रोजी होळी आणि २५ तारखेस धुलीवंदन असल्याने कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी आणि कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ठाणे पोलीस आयुक्तलयाच्या विद्यमाने मोठा फौजफाटा पाच परिमंडळात तैनात करण्यात येणार आहे. रसायनयुक्त रंग फेकणे किंवा शरीरास अपायकारक ठरणारे फुगे मारण्याच्या प्रकार घडल्यास कायदेशीर कारवाईचे संकेत ठाणे पोलिसांनी दिले आहेत. होळी आणि धूलिवंदन या जल्लोषात मद्य प्राशन करून वाहन चालविणाऱ्यांचा चक्काजाम वाहतूक पोलीस करणार आहेत. या विशेष कारवाईला २३ पासून सुरुवात होत आहे. २५ मार्च रोजी संध्याकाळपर्यंत ही कारवाई सुरु राहील. पाचही परिमंडळात नाकाबंदीच्या ठिकाणी वाहतूक पोलीस ब्रेथ ॲनालायझर मशीनद्वारे तपासणी करणार आहेत. या वाहतूक पोलिसांच्या विशेष  कारवाईसाठी जवळपास ६३ पोलीस अधिकारी आणि ६५० पोलीस कर्मचारी तैनात राहणार आहेत.

ठाणे पोलिसांचा २ हजाराच्या आसपास मनुष्यबळाचा बंदोबस्त  
ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील पाच परिमंडळात ठाणे पोलीसंाचा जवळपास २ हजाराच्या आसपास बंदोबस्त विविध ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी तैनात करण्यात येणार आहे. यात उच्च उपायुक्त दर्जाचे पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, सपोनि, सपोउपनि, ठाणे अंमलदार, पोलीस कर्मचारी पुरुष आणि महिलांचा समावेश असणार आहे. वाहतूक विभागाचे जवळपास ७०० पेक्षा अधिक  पोलीस अधिकारी आणि कर्मचारी तैनात राहणार आहेत.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

होळी सणासाठी आगरी-कोळी समाजाची वाफेवर बनविल्या जाणाऱ्या पापड्यांची लगबग सुरु