मागाठाणे ते ठाणे स्टेशन बेस्ट बसच्या टायरला आग; जीवितहानी नाही

ठाणे : ठाण्याच्या कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागाठाणे ते ठाणें स्टेशनकडे निघालेल्या बेस्ट बसचा लायनर गरम झाल्याने तयारीला आग लागण्याची घटना २३ मार्च रोजी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास घडली. यावेळी बसमध्ये ६० ते ६५ प्रवासी प्रवास करीत होते. त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. या अपघातात कुठलीही जीवितहानी झालेली नसल्याचे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सांगितले.

सकाळी सव्वा दहा वाजता कासारवडवली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेस्ट बसला हा अपघात घडला. बेस्टची बस ही  मागाठाणे बस डेपोकडून घोडबंदर मार्गे ठाणे स्टेशनकडे जात होती. सदर बेस्ट बस हि नवरत्न हॉटेल जवळ, कासारवडवली सिग्नल परिसरात आल्यानंतर बसच्या टायरमधील ब्रेकसाठी आवश्यक असलेला लायनर गरम झाल्याने टायरला आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे एकाच खळबळ उडाली. बेस्ट बसचा चालक जीवन जयाजी पोयरेकर आणि  वाहक अरविंद प्रेमदत्त मिश्रा यांच्या लक्षात ही बाब येताच त्यांनी त्वरित घटनास्थळी बस थांबवली आणि बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरविण्यात आले. सदर घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस अधिकारी व कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्य केले आणि अग्निशमन दलाचे जवानांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

होळीसाठी ठाणे पोलिस सज्ज