गच्चीवरील मोबाईल टॉवरला भीषण आग

कल्याण : कल्याण पश्चिमेतील इमारतीच्या टेरेसवर असलेल्या मोबाईल टाँवरला आग लागल्याची घटना राधानगर परिसरात २१ मार्च रोजी घडली. या आगीत मोबाईल टॉवर जळून खाक झाला. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी तत्काळ धाव घेत आगीवर नियंत्रण मिळविले.

कल्याण पश्चिमेकडील राधानगर परिसरात असलेल्या ७ मजली इमारतीच्या गच्चीत असलेल्या मोबाइल टॉवरला आग लागली. या आगीमुळे धूराचे लोट परिसरात मोठ्या प्रमाणावर पसरले होते. आगीची माहिती अग्निशमन दलाला दिल्यानंतर अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तासाभराच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन विभागाला यश आले. शॉर्टसर्कटिमुळे आग लागल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या मोबाईल टाँवरच्या आगीच्या घटनेने इमारतीच्या टेरेसवर उभारलेल्या मोबाईल टाँवरच्या सुरक्षा प्रश्न यानिमित्ताने ऐरणीवर आला आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘नवी मुंबई मेट्रो रेल्वे मार्ग'च्या पुलावर अनधिकृत भित्तीपत्रके, संदेशवहन तारा