लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी रूट मार्च - राजेंद्र कदम 

नवीन पनवेल : आगामी लोकसभा निवडणूक भयमुक्त वातावरणात पार पडावी म्हणून नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या मार्गदर्शनाखाली कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांच्या नेतृत्वाखाली १९ मार्च रोजी रूट मार्च काढण्यात आला.

          कळंबोली पोलिस ठाण्यातून काढण्यात आलेल्या या रूट मार्चमध्ये 11 अधिकारी 80 अंमलदार त्यामध्ये आरपीएफ जवान, कळंबोली पोलीस ठाणे मधील अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. कळंबोली पोलिस ठाणे हद्दीतील महत्त्वाची मतदान केंद्रे, संवेदनशील परीसर, संमिश्र वस्ती तसेच निवडणुकीच्या अनुषंगाने महत्वाची ठिकाणे फिरण्यात आले. पोलीस ठाणे येथून सुरू झालेला हा रूट मार्च  सेक्टर 1 इ - सेक्टर 1, 2, 3 ई , 4 ई , 5 ई , 6 ई, 9 ई, 14, 6, 5 येथे फिरून पोलीस ठाणे येथे सांगत करण्यात आली. 6 वाहनांसह पायी भेटी देवुन त्यांना परीसर व परीस्थितीची माहिती देण्यात आली.  एप्रिल, मे २०२४ मध्ये होणारी  लोकसभा निवडणुकीत आपला अमूल्य मतदानाचा अधिकार भयमुक्त वातवरणात बजावता यावा, या निवडणूकी दरम्यान कोणतेही अनुचित प्रकार होणार नाहीत यासाठी या रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते. असे यावेळी कळंबोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कदम यांनी सांगितले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 सिडको भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकण्याचा प्रयत्न