वाढते उन, रमजान पार्श्वभूमीवर कलिंगड मागणीत वाढ

वाशी : उन्हाळ्याची चाहूल लागताच वाशी मधील मुंबई कृषि उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) फळ बाजारपेठेत कलिंगड फळाची आवक वाढली आहे. वाढलेला उन्हाळा, रमजान महिना यामुळे गोडव्यासह थंडावा देणाऱ्या कलिंगडाला मागणीही वाढली आहे. कलिंगड फळाला घाऊक बाजारात ८ ते १२ रुपये किलो दर असून किरकोळ बाजारात नगवार आकारानुसार ४० ते २०० रुपये कलिंगड दर पर्यंत आहे.

वाढत्या उष्म्यामुळे सरबतासोबतच कलिंगडाला ग्राहकांकडून मागणी वाढली आहे. उन्हाळा वाढल्यावर रसदार फळांना मागणी वाढते. त्यानुसार सध्या कलिंगडला मागणी वाढत आहे. दररोज एपीएमसी फळ बाजारात २५ ते ३० ट्रक कलिंगड यायला सुरुवात झाली आहे. एक ट्रक मध्ये दहा ते अकरा क्विंटल माल असतो. सदर सर्व कलिंगड  सोलापूर, नगर, सांगली मधून येत आहेत. मार्च, एप्रिल, मे महिना कलिंगड फळाचा मुख्य हंगाम असतो. या हंगामात कलिंगडाच्या पन्नास ते साठ गाड्या घाऊक एपीएमसी फळ बाजारात येतात. दुसरीकडे नुकताच रमजान महिना सुरु झाला आहे. त्यामुळे कलिंगड मागणीत आणखी वाढ झाली आहे. घाऊक बाजारात कलिंगडाचे दर ८ ते १२ रुपये किलो असून, किरकोळ बाजारात जास्त करुन नगावर कलिंगड विकले जातात. आता कलिंगड हंगाम सुरु झाला असल्याने आत्ताच कलिंगडाची आवक सुरु झाली आहे. त्यामुळे कलिंगड दर वाढीव आहेत. मात्र, आवक वाढल्यावर कलिंगड दर नियंत्रणात येतील, अशी माहिती एपीएमसी फळ बाजारातील व्यापारी शिवाजीराव चव्हाण यांनी दिली.

कलिंगडाचा हंगाम बहरात आल्यानंतर एपीएमसी फळ बाजारात कलिंगड आवक आणखी वाढणार आहेल. शुगर किंग जातीचे कलिंगड आकाराने गोल आणि मोठे असते. त्यामुळे फळ विक्रेते तसेच ज्यूस सेंटर चालकांकडून शुगर किंग जातीचे कलिंगडाला मागणी मोठ्या प्रमाणात असते. तर घरगुती ग्राहक छोट्या आकाराचे निफाड, बेबीशुगर या जातीचे कलिंगड खरेदी करतात.कलिंगडाचा हंगाम मार्चपासून सुरु होत असून तो जून महिन्यापर्यंत  सुरु असतो. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राजेंद्र घरत, चित्रा बाविस्कर यांची पुस्तके ब्रेल लिपीत प्रकाशित