राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा 

ठाणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार पक्ष कार्यालयात ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा  ऋताताई जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे शहर महिलाध्यक्ष सुजाताताई घाग यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाध्यक्ष सुहास देसाई यांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात महिला दिन साजरा करण्यात आला.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून पक्ष कार्यालयात क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले आणि फातिमा बी यांच्या प्रतिमांना सुजाताताई घाग आणि सुहास देसाई यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आले. तसेच , महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर कोपरी -पाचपाखाडी, ठाणे, ओवळा-माजीवडा मतदारसंघातील अनेक महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
या प्रसंगी सुहास देसाई यांनी सर्व महिलांना शुभेच्छा देताना संघर्ष हाच उत्कर्षाचा मार्ग आहे. या मार्गातूनच चांगले दिवस महिलांना येतील, असे सांगितले. तर, सुजाताताई घाग यांनी, राजमाता जिजाऊ, अहिल्यादेवी, सावित्रीमाई,  फातिमा बी आणि माता रमाबाई यांच्या त्यागामुळेच आपणाला चांगले दिवस  पहायला मिळाले आहेत. त्याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. अलिकडच्या काळात आपले नेते शरदचंद्र पवार यांच्यामुळेच आपणाला 33% आरक्षण मिळाले आहे. महिला उत्थानासाठी शरद पवार यांचे प्रचंड काम असल्याने आपण त्यांचे हात बळकट करण्यासाठी आपणाला लढावे लागेल, असे सांगितले.

या कार्यक्रमात  ज्योती निबंरंगी, माधुरी सोनार,  वंदना लांडगे,  हाजी बेगम शेख, रेशमा भानुशाली,  संगीता चंद्रवंशी, सुरेखा जाधव,  सुजाता गवळी,  प्रियांका रोकडे,  शुभांगी कोळपकर,  सुनीता खरात,  सुजाता कदम,  कोमल पंडित,  मनीषा भाबड, शुभांगी खेडेकर, रेणू अलगुडे,  संगीता शेळके,  सुनिता मोकाशी, रोशनी कुडले,  अवंतिका भोसले,  प्रतिभा टपाल,  सुप्रिया कांबळे,  मनीषा पाटील,  विजया दामले,  वर्षा साबळे,  प्रियंका सोनार,  स्नेहल चव्हाण,  संगीता तोहेकर,  ललिता कानवडे,  सीमा कदम,  लीलावती प्रजापती,  बिंदू पटवा,  रुक्मणी पाटील, श्रीमती दीपिका गवस,  कुसुम दुबे,  विमल माने,  लाली प्रजापती,  सुप्रिया नागवेकर,  नीतू प्रजापती,  गुंजा यादव,  सपना यादव,  ज्योती प्रजापती,  निर्मला कनोजिया  इंदु दुरी,  प्रेमा अन्सारी,  जयश्री कोळेकर आदी महिला उपस्थित होत्या.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सायन-पनवेल महामार्गावर प्रवाशांसाठी १६ कोटी खर्चाची सुविधा कामे