नवी मुंबई मधील महिला पत्रकारांचा सन्मान

नवी मुंबई मधील महिला पत्रकारांचा सन्मान

नवी मुंबई ः ‘जागतिक महिला दिन'चे औचित्य साधून ‘नवी मुंबई जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन'च्या वतीने नवी मुंबई महापालिका मुख्यालय मधील ‘पत्रकार कक्ष'मध्ये महिला पत्रकारांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिनींच्या महिला पत्रकारांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
याप्रसंगी महापालिका अतिरिवत आयुवत सुजाता ढोले, विधी तज्ञ ॲड. वंदना दळवी, पोलीस अधिकारी शुभांगी पाटील, अभिनेत्री श्रेजा म्हात्रे, गोल्ड मेडल विजेत्या वुÀस्तीपटू राजश्री बांगर तसेच ‘नवी मुंबई जर्नालिस्ट वेल्फेअर असोसिएशन'चे प्रमुख सल्लागार विश्वरथ नायर, अध्यक्ष अशोक शेशवरे यांच्यासह इतर पदाधिकारी-सदस्य आणि महिला पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
घर आणि कार्यालयात काम करतांना महिलांनी आरोग्याची काळजी घ्ोणे आवश्यक आहे. स्वभाव कितीही सकारात्मक असला तरी होय बरोबर नाही, असा शब्दही आपल्या डिक्शनरीत असला पाहिजे. जर एखादे काम आपल्या मनाविरुध्द होत असेल तर तिथे नाही म्हणायला शिकणे काळाची गरज आहे, असा सल्ला अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले यांनी महिला पत्रकारांना दिला.
सदर प्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करताना अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले म्हणाल्या की,
आजचे जीवन फार धावपळीचे आहे. या काळातही महिलांनी आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्ोतली पाहिजे. दुखणे अंगावर काढणे सोडून दिले पाहिजे. एखाद्या विकारावर लवकर उपचार केला तर तो बरा होतो. मात्र, परिस्थती हाताबाहेर गेली तर अनर्थ घडतो आणि संपूर्ण कुटुंबाची घडी बिघडते. आपल्या मुलांवर चांगले संस्कार झाले तरच भावी पिढी उत्तम होईल, अन्यथा फार मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे, असेही सुजाता ढोले यांनी यावेळी स्पष्ट केले.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिलकुमार उबाळे यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात महिला दिन उत्साहात साजरा