पनवेल मध्ये पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम

पनवेल : पाणीपट्टी वसुलीसाठी पनवेल महापालिका प्रशासनाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. आयुक्त गणेश देशमुख यांच्या सुचनेनुसार पाणी पुरवठा विभागाच्या वतीने थकबाकीदार नळकनेक्शन धारकांविरोधात मोहीम सुरु करण्यात आली आहे. गेल्या आठ दिवसांपासून सदर मोहीम सुरु असून याअंतर्गत सुमारे ७२ लाख रुपयांची पाणीपट्टी वसुली करण्यात आली आहे.

पनवेल महापालिका हद्दीत एकूण १६,७३२ नळ जोडणीधारक आहेत. महापालिकेची पाणी कराची १७.९४ कोटी रुपयांची मागणी असून या आर्थिक वर्षात ५.५० कोटींची वसुली झाली आहे. अजुनही १२.४४ कोटी रुपयांची पाणीकर थकबाकी शिल्लक आहे. थकबाकीधारकांना पाणीकर भरणा नोटिसीचे वाटप करण्यात आले आहेत. लाखोंच्या घरात थकबाकी असणाऱ्या थकबाकीदारांविरोधात पनवेल महापालिकेने वसुली मोहीम सुरु केली आहे. मोहीम सुरु केल्यापासून सुमारे ७२ लाखांची वसुली झाली आहे. तसेच पाणीकर थकबाकीदारांनी भरला नाही तर पाणी कर संकलन विभागांतर्गत संबंधितांची नळ जोडणी खंडीत करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.

पाणी कर थकबाकीधारकांनी त्वरित पनवेल महापालिका कार्यालयात येऊन पाणी कराचा भरणा करावा. अन्यथा कोणतीही पूर्वसूचना न देता नळ कनेक्शन खंडीत करण्याची कारवाई  करण्यात येईल. - गणेश शेटे, उपायुवत-पनवेल महापालिका. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पथदिव्यांमुळे उड्डाणपुलाखालील भाग प्रकाशमान