‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक सिंघल यांची नवी मुंबई विमानतळ प्रकल्पाला भेट

नवी मुंबई : ‘सिडको'चे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी १ मार्च २०२४ रोजी उलवे येथील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी प्रकल्पाची अंमलबजावणी गतीने आणि वेळेत व्हावी याकरिता संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना दिल्या.  

याप्रसंगी ‘सिडको'चे सह-व्यवस्थापकीय संचालक शान्तनु गोयल, सह-व्यवस्थापकीय संचालक दिलीप ढोले, मुख्य महाव्यवस्थापक (परिवहन-विमानतळ) गीता पिल्लई, मुख्य अभियंता (नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ) शीला करुणाकरन, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ मुख्य कार्यकारी अधिकारी कॅप्टन बीव्हीजेके शर्मा यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी २३ फेब्रुवारी २०२४ रोजी ‘सिडको'च्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारला. त्यानंतर २६ फेब्रुवारी रोजी त्यांनी ‘सिडको'तील विभाग प्रमुखांची बैठक बोलावून ‘सिडको'च्या विविध प्रकल्पांच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. तद्‌नंतर १ मार्च रोजी ‘नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प'च्या भौतिक प्रगतीची पाहणी करण्याच्या उद्देशाने विमानतळ प्रकल्प स्थळाला भेट दिली.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प राष्ट्रीय दृष्टीकोनातून अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी वेगाने आणि नियोजित वेळेत व्हावी या उद्देशाने प्रकल्पाच्या भौतिक प्रगतीचा आढावा घेणे, भेटीमागील प्रयोजन आहे. - विजय सिंघल, व्यवस्थापकीय संचालक-सिडको. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 पनवेल मध्ये पाणीपट्टी थकबाकी वसुली मोहीम