सीवूड्‌स सेवटर-४६ए मध्ये नियमबाह्यरित्या खोदकाम

 नवी मुंबई : सीवूड्‌स सेवटर-४६ए मधील भूखंड क्रमांक-५ए, ५ या भूखंडावर इमारत बांधण्याचे काम सुरु असून, या बांधकामासाठी करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे स्थानिक रहिवाशांना त्रास होत असून,  खोदकाम करताना पर्यावरण नियमांची ‘एैसी-तैसी' केली जात असल्याने सदर दोन्ही भूखंडावरील खोदकाम, विकासकाम यांना जनतेच्या हितासाठी स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी भाजप युवा नेते दत्ता घंगाळे यांनी नवी मुंबई महापालिका आयुवत राजेश नार्वेकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

सीवूड्‌स सेवटर-४६ए मधील भूखंड क्रमांक-५ए, ५ या भूखंडावर इमारत बांधण्याकरिता महापालिका द्वारे परवानगी देण्यात आली आहे. या इमारत बांधकामासाठी दिवसभर ब्लास्टींग करण्यात येत असल्याने आजुबाजुच्या सिडको निर्मित इमारतींना हादरे बसत असून, इमारतींना तडे जाणे, खिडकीच्या काचा फुटणे, ज्येष्ठ नागरिकांना सुन्न होणे, विद्यार्थ्यांना अभ्यासात त्रास होणे, अशा घटना दिवसभर घडत आहेत. सदर ठिकाणी होत असलेल्या खोदकामात पर्यावरण नियमांची पायमल्ली केली जात असून, मोठ्या प्रमाणावर माती-दगड यांची डंपरमधून ओव्हरलोड वाहतुक दिवसभर नियमबाह्य पध्दतीने रहिवाशी क्षेत्रातून केली जात आहे. त्यामुळे अपघाताच्या घटना वारंवार घडत आहेत.  विशेष म्हणजे सीवूड्‌स सेवटर-४६ए मधील भूखंड क्रमांक-५ए आणि ५ या दोन भूखंडावर दोन वेगवेगळ्या विकासकांना वेगवेगळी बांधकाम परवानगी महापालिकेने दिली असताना सदर दोन्ही एकत्र करुन खोदकाम सुरु आहे. त्यातच भूखंड क्रमांक-५ए यावर बांधकाम करणाऱ्या विकासकाने शेजारी असलेल्या महापालिकेच्या खेळाच्या मैदानातील (भूखंड क्रमांक-६) काही भागावर अतिक्रमण केले असून, या अतिक्रमणावर नगरविकास विभागाकडे पत्रव्यवहार करुनही काहीही कारवाई झालेली नाही, असे दत्ता घंगाळे यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात निदर्शनास आणले आहे.

रहिवासी क्षेत्रात कंट्रोल युनिटद्वारे ब्लास्टिंग करता येत नसतानाही सीवूड्‌स सेवटर-४६ए मधील भूखंड क्रमांक-५ए आणि ५ या भूखंडावर कंट्रोल युनिटद्वारे करण्यात येणारी ब्लास्टिंग तत्काळ बंद करण्यात यावी, रहिवासी क्षेत्रातून माती-दगड यांची डंपरमधून होणारी ओव्हरलोड वाहतुक बंद करुन दगड-मातीची वाहतुक पामबीच मार्गे वळवावी, सदर दोन्ही भूखंडावर नियमबाह्य पध्दतीने सुरु असलेल्या खोदकामाची आणि महापालिका खेळाच्या मैदानातील काही भागात विकासकाने केलेल्या अतिक्रमणाची आपण स्वतः पाहणी करावी, आदी मागण्याही दत्ता घंगाळे यांनी महापालिका आयुवतांना दिलेल्या निवेदनात केल्या आहेत.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने मागणीची दखल घेतली नाही तर महापालिका विरोधात आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दत्ता घंगाळे यांनी दिला आहे.
सीवूड्‌स सेवटर-४६ए मधील भूखंड क्रमांक-५ए, ५ या भूखंडावर इमारत बांधकाम होत असलेल्या आजुबाजुच्या सोसायटींमध्ये ८०० पेक्षा जास्त सदनिका असून, खोदकामामुळे किमान ४ हजारपेक्षा जास्त लोकसंख्या बाधित होत आहे. त्यामुळे सदर दोन्ही भूखंडावर नियमबाह्य पध्दतीने सुरु असलेल्या खोदकामाची महापालिका प्रशासनाने गांभीर्याने दखल घेण्याची गरज आहे. - दत्ता घंगाळे, युवा नेते - भाजप, नवी मुंबई. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिकेची मालमत्ता जप्ती मोहीम