उरण नगरपरिषद तर्फे लवकरच गॅस शवदाहिनी

उरण : उरण नगरपरिषद मार्फत उरण मधील नागरिकांची सोय आणि पर्यावरण रक्षणाचे महत्त्व लक्षात घेऊन उरण शहरातील बोरी स्मशानभूमीत गॅसवर आधारित शवदाहिनी उभारण्याचे बांधकाम आणि  आस्थापनाचे काम पूर्ण झाले असून, या शवदाहिनीमध्ये गॅस कनेक्शन मिळण्यासाठी उरण नगरपरिषद तर्फे महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडे प्रस्ताव देण्यात आला आहे. महानगर गॅस कंपनीने शवदाहिनीमध्ये गॅस कनेक्शन देण्यासाठी बोरी स्मशानभूमीपर्यंत गॅसची पाईपलाईन टाकण्यासाठी परवाना देण्याचा प्रस्ताव नगरपरिषदकडे दिला असून, त्यास उरण नगरपरिषदेने मंजुरी दिली आहे. येत्या महिन्याभरात उरण शहरातील बोरी स्मशानभूमीत गॅस शवदाहिनी सुरु होणार आहे, अशी माहिती ‘उरण नगरपरिषद'चे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी दिली.

उरण नगरपरिषदेच्या गॅस शवदाहिनी सुविधेमुळे नागरिकांनाही फायदा होणार आहे. उरण शहरातील बोरी येथे स्मशानभूमी असून, या स्मशानभूमी मध्ये  लाकडाचा वापर करुन दहन केले जात असल्याने प्रदूषणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे पर्यावरणाला धोका न पोहोचवता दहन करण्यासाठी सुवर्ण महोत्सव नगर उत्थान कार्यक्रम अंतर्गत ९५ लाखांच्या निधीमधून गॅस शवदाहिनी प्रकल्प राबविला जात आहे. उरण शहरातील बोरी येथील स्मशानभूमी अनेक समस्यांनी ग्रासली आहे.  उरण नगरपरिषदेच्या सर्वात मोठ्या बोरी स्मशानभूमीत नव्याने गॅस शवदाहिनी उभारण्यात आली आहे. यामुळे दहनासाठी लागणाऱ्या लाकडांमुळे होणाऱ्या धुरामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. या नव्या गॅस वाहिनीमुळे धूररहित अंत्यसंस्कार होणार आहेत. त्यामुळे लाकडांची बचत होऊन निसर्गाचेही संरक्षण होणार आहे. उरण नगरपरिषद महानगर गॅस लिमिटेड कंपनीकडून गॅस विकत घेणार असून,  गॅस शवदाहिनी सुविधा ‘ना नफा, ना तोटा' या तत्वावर चालविण्यात येणार आहे, असे ‘उरण नगरपरिषद'चे मुख्याधिकारी समीर जाधव यांनी सांगितले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ‘पनवेल'चा ३९९१.९९ कोटींचा अर्थसंकल्प जाहीर