मोरबे धरणाची जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई शहरात पाणी संकट

वाशी : नवी मुंबई शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या मोरबे धरणावरील मुख्य जलवाहिनी सीबीडी-बेलापूर सेक्टर-२८ मध्ये १६ फेब्रुवारी रोजी दुपारी फुटल्यानंतर दुरुस्तीला सात ते आठ  तास लागणार असल्याने नवी मुंबई शहरात दुपारनंतर पाणी संकट ओढवले होते.

नवी मुंबई महापालिकेच्या मोरबे धरणातून नवी मुंबई शहरात पाणी पुरवठा केला जातो. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी सीबीडी-बेलापूर  सेक्टर-२८ मध्ये मोरबे धरणावरील मुख्य जलवाहिनी फुटली. त्यामुळे दुरुस्तीच्या कारणास्तव भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्रावरील मुख्य जलवाहिनीवरील पाणी बंद ठेवण्यात आली होती. सदर जलवाहिनीचे  दुरुस्तीचे काम तात्काळ हाती घेण्यात आले होते. मात्र, सदर काम करण्यास सात ते आठ तास लागणार असल्याने १६ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा पाणी पुरवठा सुळरीत होऊन उद्या १७ फेब्रुवारी रोजी पहाटे देखील कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिका पाणी पुरवठा विभागातील अभियंत्यांनी दिली. 

 
Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

थकीत कर वसुलीसाठी मालमत्तांचा लिलाव