पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देण्यास चालढकलपणा

उरण : उरण तालुक्यातील अनेक गावांमध्ये १८ जुलै २०२३ रोजी पुराचे पाणी शिरुन ग्रामस्थांच्या आणि शेतकऱ्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तुंबरोबर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. अशा नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी शासनाने पुढाकार घेतला आहे. मात्र, नुकसान भरपाईची रक्कम शासनाच्या माध्यमातून आयसीआयसीआय बँकेत जमा होऊन देखील या बँकेकडून नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यास चालढकलपणा होत आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त रहिवासी, शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

उरण तालुक्यातील चिरनेर, चिर्ले, विंधणे, दिघोडे, वेश्वी, जासई, कळंबुसरे, कोप्रोली, खोपटा, वशेणी, सारडे, करळ, सोनारी, पागोटे, नवघर, भेंडखळ, बोकडविरा, नागांव, चाणजे, केगांव, जसखार ग्रामपंचायत हद्दीतील अनेक गावांमधील ग्रामस्थ, शेतकऱ्यांच्या घरात १८ जुलै २०२३ रोजी पुराचे पाणी घुसले होते. यावेळी घरातील जीवनावश्यक वस्तंुबरोबर भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. सद नुकसानग्रस्तांना शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्या माध्यमातून शासनकडे सातत्याने करण्यात आली होती.

यानंतर सदर मागणीची दखल घेऊन शासनाच्या माध्यमातून सदर नुकसानग्रस्तांना आयसीआयसीआय बँकेकडे नुकसान भरपाईची रक्कम जमा करण्यात आली आहे. आयसीआयसीआय बँकेच्या व्यवस्थापकांनी काही नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यासाठी पुढाकार घेतला; मात्र उर्वरित गावोगावच्या नुकसानग्रस्त रहिवासी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास आा चालढकलपणा केला जात आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांमधील नुकसानग्रस्त रहिवासी, शेतकऱ्यांमध्ये आयसीआयसीआय बँकेच्या या कारभाराबद्दल संतापाची लाट पसरली आहे.

दरम्यान, आयसीआयसीआय बँकेकडे नुकसान भरपाईची रक्कम शासनाकडून जमा झाली असून त्याचे वितरण करण्यात येत आहे, अशी माहिती आयसीआयसीआय बँकेच्या जेएनपीए-उरण शाखेकडून देण्यात आली.

आज जवळपास ७ महिन्यांचा कालावधी लोटल्यानंतर देखील नुकसानग्रस्त रहिवासी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची रवकम मिळालेली नाही. त्यामुळे नुकसान भरपाईची रवकम मिळण्याकरिता ‘उरण'चे तहसीलदार डॉ. उध्दव कदम यांच्याकडे सातत्याने मागणी केली आहे. न पेक्षा नुकसानग्रस्त रहिवास, शेतकरी आंदोलन उभारतील.
-प्रितम म्हात्रे, नुकसानग्रस्त रहिवासी, सारडे.

   उरण तालुक्यातील नुकसानग्रस्त रहिवासी, शेतकऱ्यांना नुकसान भरपाई लवकरात लवकर द्यावी यासंदर्भात आयसीआयसीआय बँक जेएनपीए-उरण शाखेला आदेश दिले आहेत. - डॉ. उध्दव कदम, तहसीलदार-उरण. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मोरबे धरणाची जलवाहिनी फुटल्याने नवी मुंबई शहरात पाणी संकट